अरे या पोलिसाचं तरी ऐका! पोटतिडकीनं बोलणाऱ्या पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

साम टीव्ही
सोमवार, 15 मार्च 2021

पोटतिडकीने बोलणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
देह देवाचे मंदिरं, आत आत्मा पांडुरंग
लोकहो, या पोलिसाचं तरी ऐका.

 

 

कोरोनाने पुन्हा हातपाय पसरलायला सुरूवात केलीय.त्यामुळे अनेक भागांत निर्बंध घातले गेलेयत.तरीही काही लोक विनाकारण गर्दी करतायत आणि नियम मोडतायत. अशा बेफिकीर लोकांना एका पोलिसानं केलेल्या आवाहनाचा व्हिडीओ व्हायरल झालाय पाहूयात

देह देवाचे मंदिरं. गाण्याचे बोल लावावेत) मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागलाय. कोरोनाचं संकट प्रत्येक पावलावर असताना, आरोग्य यंत्रणा, पोलिस घरदार सोडून सेवा करतायत. मात्र, आवाहन करूनही लोकांचे जत्थेच्या जत्थे रस्त्यांवर उतरतायत. म्हणूनच कल्याणच्या एका पोलिसाने केलेल्या आवाहनाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. धार्मिक श्रद्देचा आदर करत पोलिस कर्मचारी अनिल जातक, लोकांना आरोग्य हाच ईश्वर असल्याचं सांगतायत.

अनिल जातक यांच्या आवाहनाचा व्हिडीओ आधीच्या लॉकडाऊनमध्येही चांगलाच व्हायरल झाला होता. आताही ते ज्या पोटतिडकीने आवाहन करतायत ते ऐकून सर्वांचेच डोळे उघडायला हवेत.

अनिल जातक जे सांगतायत, त्याचा अर्थ आपल्याला कळायला हवा... कारण, अनिल जातक यांनाही घरदार आहे, कुटुंब आहे... पण, ते जीव तळहाती घेऊन रस्त्यावर उतरलेयत... तुमच्या-आमच्या जीवासाठी... त्यामुळे, जीवाच्या आकांताने हात जोडून विनम्र आवाहन करणाऱ्या या पोलिस देवदूताचं आपण ऐकायलाच हवं.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live