दुष्काळी भागात कोसऴू लागला धबधबा,निसर्गप्रेमीसाठी आकर्षणचा विषय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

गोंदवले: धो धो पडणाऱ्या पावसाने दुष्काळी माणमध्ये पाणी पाणी केलंय. कोरड्या माण नदीसह सगळेच पाणीसाठे वाहू लागलेत. गोंदवल्यातील कायम काटेरी झुडपांनी भरलेला खडकओढा वाहू लागलाय. नुसता वाहत नाही तर या ओढ्यावरील बंधारा भरून वाहत असल्याने धबधबाच तयार झालाय. मग काय..निसर्गप्रेमींसाठी हा धबधबा आकर्षण ठरला नाही तर नवलच. याबाबत दै. सकाळमध्ये नुकतेच वृत्त प्रसिद्ध झाले आणि रस्त्यालगत असलेला हा कृत्रिम धबधबा एन्जॉय करण्यासाठी आता गर्दी वाढू लागलीय.

ब्रिटिशकालीन पिंगळी तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने आधीच वाहत असलेल्या खडकओढ्याला पाणी वाढले. या ओढ्यावर गोंदवले-दहिवडी रस्त्यावर असणाऱ्या बंधाऱ्यावरून पाणी कोसळू लागले. हे कोसळणारे पांढरे शुभ्र दुधासारख्या पाण्याने धबधब्याचे रूप धारण केले आहे. रस्त्यावरून दिसणारा हा नयनरम्य धबधबा निसर्गप्रेमींना चांगलीच भुरळ पाडत आहे.

त्यामुळे याठिकाणी येऊन मौजमजा करण्यासाठी गर्दी होत आहे. अनेकजण तर हे क्षण आठवणीत साठविण्यासाठी कॅमेराबद्ध करत आहेत. त्यामुळे हा धबधबा जणू सेल्फी पॉईंटच बनला आहे. 

दै. सकाळमध्ये या ठिकाणाचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने लोकांचे या धबधब्याकडे लक्ष वेधले गेले. त्यातच भाविकांनी गोंदवलेकर महाराज समाधी दर्शनासाठीही मोठ्या संख्येने हजेरी लावली. समाधी दर्शनानंतर अनेकांनी या धबधब्यावर जाऊन सुट्टी एन्जॉय केली. गेले तीन दिवस या ठिकाणी लोकांची गर्दी वाढू लागली आहे.

Web Title: Hey! Waterfall begins in drought-prone areas
 
संबंधित बातम्या

Saam TV Live