कडब्याच्या गंजीत लपवलेला सव्वा कोटीचा गांजा जप्त

विश्वभूषण लिमये
बुधवार, 2 जून 2021

उस्मानाबादमध्ये तब्बल ४७ प्लास्टीकच्या पोत्यात भरलेला १ हजार १३२.६६ किलो गांजा पोलिसांना आढळून आला आहे. या गांजाची बाजारातील किंमत सुमारे १ कोटी २४ लक्ष ५९ हजार २६० एवढी आहे.

उस्मानाबाद : उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्याच्या कळंब Kalam तालुक्यातील मस्सा येथे शेतात कडब्याच्या गंजीमध्ये गांजा लपवून ठेवला असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली.Hidden Cannabis Seized In Osmanabad 

यावरून शोध घेत कार्रवाई करण्यात आली. या कार्रवाईत तब्बल ४७ प्लास्टीकच्या पोत्यात भरलेला १ हजार १३२.६६ किलो इतका गांजा Cannabis पोलिसांना आढळून आला आहे. या गांजाची बाजारातील किंमत सुमारे १ कोटी २४ लक्ष ५९ हजार २६० एवढी आहे.

हे देखील पहा : 

पोलीस Police कारवाईचा सुगावा लागताच आरोपी बालाजी छगन काळे,राजेंद्र उर्फ दादा छगन काळे आणि अन्य दोन आरोपी फरार झाले असुन त्यांच्या विरुद्ध कळंब पोलीसात एनडीपीएस चे कलम २० (ब) ( ii ),२९ प्रमाणे गुन्हा Case दाखल करण्यात आला आहे. Hidden Cannabis Seized In Osmanabad 

खासदार इम्तियाज जलील यांच्यासह २४ जणांवर गुन्हा दाखल 

ही कार्रवाई जिल्हा पोलीस अधिक्षक राजतीलक रोशन आणि अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.संदीप पालवे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी निलंगेकर,पोउनी माने,पोहेकॉ जगदाळे,ठाकुर,पोना चव्हाण आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

Edited By : Krushanrav Sathe


संबंधित बातम्या

Saam TV Live