कारमध्ये एकट्याने प्रवास करत आहात? तरीही मास्क घाला...

Face Mask Compulsory while Driving
Face Mask Compulsory while Driving

दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतही (Delhi) कोरोना (Corona) रुग्णांची संख्या महाराष्ट्राप्रमाणेच (Maharashtra) झपाट्याने वाढत आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमावलींचे पालन करण्याचे वारंवार प्रशासनाकडून (Administration) सर्वांना सांगितले जात आहे. "कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:च्या बचावासाठी मास्क (Mask) आवश्यकच आहे. दिल्ली हायकोर्टाने (High court)  सर्वांना खडसावले  आहे की,  "मास्कला अहंकाराचा मुद्दा बनवू नका".  High Court directed A person traveling alone in a car should also wear mask 

एकट्याने खासगी कार चालविताना मास्क घातला नाही म्हणून त्या व्यक्तीस पोलिसांमार्फत दंड ठोठावण्यात आला होता. त्याला आव्हान देणार्‍या याचिकेवर (Petition) सुनावणी झाली आहे. यावर न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंग यांनी सांगितले की, "कारमध्ये एकट्याने प्रवास करत असतानाही मास्क घालणे हा स्वतःचे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी एक चांगला मार्ग असतो. कारण जेव्हा एखादी व्यक्ती ट्राफिकच्या सिग्नल साठी थांबते आणि थांबल्यावर आपल्या वाहनाच्या खिडकीची काच खाली करते तेव्हा विषाणू शरीराच्या आत प्रवेश करू शकतात. तेव्हा संसर्ग होण्याची शक्यता असते".

एका प्रकरणात दिल्लीतील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी यापूर्वीही असेच काही कडक आदेश दिले होते. मास्क न घालून फिरणाऱ्या व्यक्तीस दंड आकारण्याचा इशारा त्यांनी दिला होता. वकील सौरभ शर्मा यांच्या याचिकेवर ही मास्क न घातल्याबाबद्दल दंड लावणाऱ्या याचिकेबद्दल सुनावणी होती. सप्टेंबर, २०२० रोजी नोकरीसाठी जाताना दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी खाजगी वाहन चालवणाऱ्या माणसांना रोखले आणि वाहनात सुद्धा तोंडाला मास्क न लावल्याबद्दल 500 रुपयांचा दंड (Fine) केला होता. High Court directed A person traveling alone in a car should also wear mask 

कोरोनाचा प्रादुर्भाव जास्तच गंभीर होत चालला असून, पुढील चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला (Corona Second Wave) जास्त पसरू न देण्यासाठी लोकांनी अधिकाधिक जागरूक रहावे, असा इशारा केंद्र सरकारने (Central government) दिला आहे. सध्या देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. एकाच दिवसा मध्ये  दिल्लीतही मंगळवारी  5100 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले.

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे". असे आरोग्य निति आयोगाचे सदस्य आणि कोरोनाविरोधी कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले आहेत. High Court directed A person traveling alone in a car should also wear mask 

कोरोनाबाधितांच्या संख्येने दिवसभरात एक लाखांचा सर्वाधिक उच्चांक गाठल्यानंतर सोमवारी बाधितांची संख्या किंचितशी कमी झाल्याचे आढळून आले तरीही संकट अजून कमी झालेले नाही.  अधिकाधिक लोकांच्या चाचण्या, लसीकरण आणि मास्क वापरणे, बंधनकारक करणे यावर सर्व राज्यांनी वाढत्या आकडेवारी नियम बनवून द्यावेत. असेही केंद्राकडून स्पष्ट निर्देश करण्यात आले आहेत. 

Edited by-Sanika Gade. 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com