गंगाखेडच्या गोदापात्रात पाण्यासाठी हाय व्होल्टेज ड्रामा.

High Voltage drama in Latur over Gangapur Water
High Voltage drama in Latur over Gangapur Water

लातूर : गंगाखेड Gangakhed शहरासाठी आरक्षित असलेल्या गोदावरीत असलेल्या कच्च्या बंधाऱ्यावर काल रात्रीपासून हाय होल्टेज ड्रामा सुरु झाला आहे. रात्रीतून पाणी सोडून देण्यात येवू नये म्हणून पोलीसांनी Police तेथे दंगल नियंत्रण Riot Control पथक नेमले. तर आज सकाळी त्याच ठिकाणी झालेल्या बैठकीत या पाणीसाठ्याचे ऑडीट करून शिल्लक राहणारे पाणी खालील गावांसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. High Voltage drama in Latur over Gangapur Water

मी शहरासाठी पाणी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार रत्नाकर गुट्टे Ratnakar Gutte यांनी दिली. तर शहरवासीयांची कोरोना काळात भटकंती होवू नये, एवढाच आपला ऊद्देश असल्याचे कॉंग्रेस Indian National Congress तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून गोदापात्रातल्या Godavari कच्च्या बंधाऱ्यातील पाण्यावरून वातावरण चांगलेच तापलेले आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी खालच्या भागातील गावांसाठी हे पाणी सोडण्याची आग्रही भुमिका घेतली. तर कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी हे पाणी शहरवासीयांसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने सोडण्यास तीव्र विरोध केला. 

यादव यांच्या तक्रारीवरून येथे पोलीस Police बंदोबस्तही लावण्यात आला आहे. या दरम्यान काल आमदार गुट्टे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी सदर पाणी सोडण्याची तयारी केली होती. ही बाब समजताच गोविंद यादव, नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी जिल्हाधिकारी डॉ. दीपक मुगळीकर, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांचेशी संपर्क साधत हा प्रकार थांबवण्याची मागणी केली. पो. नि. वसुंधरा बोरगावकर यांनी लगोलग बंधरास्थळी धाव घेत तेथे हजर असणारांना पाणी सोडण्यापासून रोखले. 
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com