अकोल्यात हिंदू व्यक्तीच्या हस्ते मशिदीचे लोकार्पण

अॅड. जयेश गावंडे
सोमवार, 29 मार्च 2021

मागील वर्षी या नविन मशिदीचे पायाभरणी चे काम देखील हिंदू बांधवांच्या हस्ते झाले होते.  दरम्यान आता बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मशिदीचा लोकार्पण सोहळा हिंदू बांधवांच्या हस्ते पार पडला

अकोला:अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथे हिंदू व्यक्तींच्या हातून मुस्लिम (Muslim) धर्मियांचे श्रद्धास्थान मशिदीचे लोकार्पण करण्यांत आले आहे. विशेष म्हणजे मागिल वर्षी या नविन मशिदीचे (Mosque) पायाभरणी चे काम देखील हिंदू (Hindu) बांधवांच्या हस्ते झाले होते.  दरम्यान आता बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मशिदीचा लोकार्पण सोहळा हिंदू बांधवांच्या हस्ते पार पडला,असुन सामाजिक एकोप्याचे दर्शन या निमित्ताने झाले आहे. Hindu Person Dedicated Mosque to Muslim Community in Akola   

तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथे मागिल वर्षी नविन मशिदीचे पायाभरणी चे काम हिंदू बांधवांच्या हस्ते झाले होते. एक वर्षानंतर मशिदीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आता या नवीन मशिदी चा लोकार्पण सोहळा येथील हिंदू बांधवांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांनी नमाजपठणाचे (Namaz) महत्व पटवून सांगितले.

जगातील संपूर्ण मानवजात एकाच ईश्वराची निर्मिती असुन सर्वांना माणूस म्हणून पाठवले आहे आपण ज्या देशात राहतो, त्या देशावर आपले प्रेम असले पाहिजे. हिंदू स्थानात एकोपा कायम राहिला पाहिजे, असेही यावेळी सांगण्यात आले आहे. नमाजपठण झाल्यावर हिंदू बांधवांना मराठीतील कुराण भेट म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले आहे.  Hindu Person Dedicated Mosque to Muslim Community in Akola   

Edited By-Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live