SPECIAL | मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणातून हिंदू शब्द गायब...

वैदेही काणेकरसह ब्युरो रिपोर्ट
मंगळवार, 14 जानेवारी 2020

शिवसेना पक्षप्रमुख त्यांच्या प्रत्येक भाषणाची सुरूवात ही इथं जमलेल्या हिंदू या शब्दाने असायची..पण उद्धव ठाकरेंच्या भाषणातून हिंदू शब्दच गायब झाल्यानं आता सर्वांच्याच भुवया उंचावल्यायेत. कॉग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यांनतर शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत अनेक सवाल उपस्थित केले गेले. सत्तेसाठी शिवसेनेला धर्मनिरपेक्ष पक्षांसमोर झुकावं लागेल असंही बोललं जात होतं. तर शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम होती. पण मग भाषणाच्या सुरूवातीला हिंदू शब्द का नाही? असा सवाल उपस्थित होणं स्वाभाविक आहे. 

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं हे भाषण बरंच काही सांगून जातंय. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार ते धर्मनिरपेक्षता या वाटेनं सुरू असलेला शिवसेनेचा प्रवास कटट्रर शिवसैनिकांना कितपच पचणार हे सांगणं तुर्तात तरी कठीणच आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live