लासलगावमध्ये हिंगणघाट घटनेची पुनरावृत्ती

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

       काही दिवसांपूर्वीच हिेगणघाटमध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळीमा फासणारा असाच हा प्रकार होता. जळाल्यानंतर पीडितेला होणाऱ्या वेदना ही संपूर्ण महाराष्ट्राची वेदना बनूून राहिली होती. मात्र या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच नाशिकच्या लासलगावमध्ये हिंगणघाट घटनेची पुनरावृत्ती झालीये... लासलगावमध्ये प्रेमप्रकरणातून महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्यात आलंय. या हल्ल्याला बळी पडलेली महिला ही बसस्थानकावर बसची वाट पाहत होती. तेवढ्यात ३ ते ४ माथेफीरुंनी या महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवलं आणि सर्व आरोपी पसार झाले.

       काही दिवसांपूर्वीच हिेगणघाटमध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळीमा फासणारा असाच हा प्रकार होता. जळाल्यानंतर पीडितेला होणाऱ्या वेदना ही संपूर्ण महाराष्ट्राची वेदना बनूून राहिली होती. मात्र या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच नाशिकच्या लासलगावमध्ये हिंगणघाट घटनेची पुनरावृत्ती झालीये... लासलगावमध्ये प्रेमप्रकरणातून महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्यात आलंय. या हल्ल्याला बळी पडलेली महिला ही बसस्थानकावर बसची वाट पाहत होती. तेवढ्यात ३ ते ४ माथेफीरुंनी या महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवलं आणि सर्व आरोपी पसार झाले. मात्र एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. हल्ल्यात ही महिला 50 टक्के भाजली आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय...  इतरही आरोपीेना पोलिस ताब्यात घेतीलच मात्र अशा घटना नेमक्या कधी थांबतील असाच प्रश्न समाजमनातून विचारला जातोय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live