मायबापांनो काळजी घ्या ! पोलिसांनी पथसंचलनातून नागरिकांना घातली प्रेमळ साद

संदीप नागरे
शुक्रवार, 28 मे 2021

सरकारने लॉकडाऊन नियमात सुट दिली तर बाजारात गर्दी होऊ नये, यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासनाने आज हिंगोली शहरात अनोखे पथसंचलन करत, नागरिकांना गर्दी न करण्यासाठी भावनिक साद घातली आहे.  

हिंगोली - महाराष्ट्रात Maharashtra सुरू असलेले लॉकडाऊन Lockdown १ जून रोजी संपणार आहे. पुढील काही दिवस हे लॉकडाऊन सुरूच राहणार असून ज्या जिल्ह्यात बाधित रुग्ण संख्या कमी तसेच मृत्यू दर घटलेला आहे.अश्या जिल्ह्यात हळूहळू नियम शिथिल करणार असल्याचे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. Hingoli Police Navigation Urging Citizens Not To Crowd 

हे देखील पहा -

मात्र सरकारने लॉकडाऊन नियमात सुट दिली तर बाजारात गर्दी होऊ नये, यासाठी हिंगोली Hingoli जिल्हा प्रशासनाने आज हिंगोली शहरात अनोखे पथसंचलन Navigation करत, नागरिकांना गर्दी न करण्यासाठी भावनिक साद घातली आहे. Hingoli Police Navigation Urging Citizens Not To Crowd 

या पथसंचलना दरम्यान हिंगोली शहर पोलिस Police ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी स्वतः हातात माईक घेत, शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, शासकीय विश्रामगृह या शहरातील प्रमुख महामार्गांसह विविध भागात फिरून रस्त्यावर विनाकारण गर्दी  Crowd करणाऱ्या नागरिकांना प्रेमळ मनाने साद घातली.

अकोलेकरांना दिलासा; कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. या वेळी नेहमी कडक भाषेत समजावणारे पोलीस चक्क, मायबाप, नागरिकांनो हा काळ कठीण आहे, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या, लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले तरीदेखील आपण कोरोना Corona नियमांचे कठोरपणे पालन करा, गर्दी करू नका असे भावनिक आवाहन करत होते.Hingoli Police Navigation Urging Citizens Not To Crowd 

नागरिक देखील गर्दी मधून बाहेर पडत होते. हिंगोली पोलीसांच्या या पथसंचलनात वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह स्थानिक पोलीस व होमगार्ड जवानांनी सहभाग नोंदवला होता.

Edited By: Krushnarav Sathe  


संबंधित बातम्या

Saam TV Live