हिरे कुटूंबियांचा भाजपला ‘रामराम’ ठोकत आज राष्ट्रवादीत प्रवेश

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मुंबई : नाशिक जिल्हातील नामांकित राजकीय घराणं म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिरे कुटूंबियांनी भाजपला ‘रामराम’ ठोकत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार प्रशांत हिरे व अपुर्व हिरे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व छगन भुजबळ उपस्थित होते. 

हिरे यांच्या प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी काॅग्रेसला नाशिकमध्ये वजनदार उमेदवार मिळाल्याने भाजप समोर कडवे आव्हान उभे राहणार असल्याचे मानले जाते.

हिरे कुटूंबिय 2012 च्या दरम्यान राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमधे सहभागी झाले होते. अपुर्व हिरे यांना भाजपने विधानपरिषद सदस्यत्वाची संधी दिली होती. मात्र आता ऐन निवडणूकीच्या तोंडावर हिरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.

Web Title: Hire Family transfers to Rashtravadi Congress fro BJP 

संबंधित बातम्या

Saam TV Live