VIDEO | HIVग्रस्त मुलांना शाळेतून हकललं, 'त्या' मुलांना शिकण्याचा अधिकार नाही का? वाचा काय घडलंय?

साम टीव्ही
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021
  • एचआयव्हीग्रस्त मुलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला
  • एचआयव्हीग्रस्त मुलांना शाळेतून हकलल्याचा आरोप
  • 'त्या' मुलांना शिकण्याचा अधिकार नाही का?

एचआयव्हीग्रस्त विद्यार्थ्यांना शाळेतून हकलल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात घडलाय. एचआयव्हीग्रस्त असल्यानं विद्यार्थ्यांना शिक्षणाचता हक्क नाकारल्यानं संताप व्यक्त केला जातोय.

ही निरागस मुलं पाहा...

या मुलांचा शिकण्याचा अधिकार नाकारलाय. बीड जिल्ह्यातल्या पाली जिल्हा परिषद शाळेतून या मुलांना हकलण्यात आलं. या मुलांचा दोष एवढाच की ती एचआयव्हीग्रस्त आहेत. लॉकडाऊननंतर ही मुलं पहिल्यांदाच शाळेत गेली. पण त्यांना शाळेत बसण्यास मनाई केल्याचा आरोप विद्यार्थी आणि एचआयव्हीग्रस्त मुलांची संस्थेनं केलाय. 

शाळेच्या मुख्याध्यापकांनी हे आरोप फेटाळलेत. संस्थेच्या माणसानंच विद्यार्थ्यांना शाळेतून नेल्याचा दावा मुख्याध्यापकांनी केलाय.

एचआयव्हीग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारणं ही क्रूरता आहे. आणि हे कौर्य जे कोणी करत असेल त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जातेय.


संबंधित बातम्या

Saam TV Live