हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर ठार 

हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर ठार 

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या अधिकाऱ्यांनी आधीच संपूर्ण खोºयात मोबाइल व इंटरनेट सेवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या अपेक्षेतून खबरदारीचा उपाय म्हणून खंडित केलेली आहे. हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर ठार झाला याशिवाय लोकांच्या येण्याजाण्यावरही कठोर निर्बंध आहेत. रियाझ नायकू हा हिज्बुल मुजाहिदीनचा ऑपरेशनल कमांडर होता. त्याला पुलवामातील बेघपोरा खेड्यात ठार मारण्यात आले. तत्पूर्वी, पोलीस प्रवक्त्याने सकाळी दहशतवादी संघटनेचा कमांडर व त्याच्या साथीदाराला चकमकीत ठार मारण्यात आल्याचे म्हटले होते; परंतु त्याची ओळख उघड केली नव्हती. नंतर अधिकाºयांनी मारला गेलेला दहशतवादी हा नायकू असल्याचे व त्याच्यावर १२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते, असे सांगितले. 


गेल्या आठ वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. बुरहान वाणी हा जुलै २०१६ मध्ये काश्मीर खोºयात चकमकीत मारला गेल्यापासून रियाझ नायकू हा त्या गटाचा जणू प्रमुखच बनला होता. बेघपोरा खेड्यात अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यावरून सुरक्षा दलांनी त्या भागाला घेरल्यानंतर त्यांच्यावर अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना नायकू व आणखी एक अतिरेकी मारला गेला. याचबरोबर शारशली खेड्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी मारले गेले. मात्र, त्यांची नावे जाहीर केली गेलेली नाहीत. 


बंदी असलेली दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनचा  कमांडर रियाझ नायकू हा बुधवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. गेल्या आठ वर्षांपासून पोलीस त्याच्या शोधात होते. जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्याच्या खेड्यात तो मारला गेल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पोलिसांच्या दप्तरात त्याचे नाव पहिल्यांदा अवंतीपोरात सहा जून, २०१२ मध्ये नोंदले गेले. त्या आधी तो बेघपोरा खेड्यातून दोन आठवडे गायब होता. त्याच्यावर ११ गुन्हे दाखल होते. दहशतवादी संघटनेत त्याने क्वचितच कोणावर विश्वास टाकला, असे वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले. नायकू हा आधुनिक तंत्रज्ञान सहजपणे हाताळायचा व त्याने स्वत:ला प्रसिद्धीपासून दूर ठेवले होते. २०१४ नंतर त्याने बुरहान वाणीला केंद्रस्थानी आणले. वाणी मारला गेल्यावर नायकूने दहशतवादी गटातील अंतर्गत राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवले व सबझार अहमद व त्याच्यानंतर झाकीर मुसा यांना संघटनेची सूत्रे हाती घेऊ दिली. रियाज नायकू हा खासगी शाळेत गणिताचा शिक्षक होता. ज्या खेड्यात त्याने २०१२ मध्ये दहशतवादी मार्गाने जायचे ठरवले त्याच खेड्यात तो पाच तास चाललेल्या चकमकीत मारला गेला. सुरक्षा दलांनी अनेक वेळा त्याला पकडण्यासाठी केलेले प्रयत्न फोल ठरले. बेघपोरा हे येथून ४० किलोमीटरवर आहे. 

WebTittle :: Hizbul Mujahideen commander killed 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com