बेस्टकडे सुट्ट्या नाण्यांचा खच

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

मुंबई: बेस्टचा प्रवास स्वस्त झाल्याने बेस्टकडे दररोज सुट्ट्या पैशांचा पाऊसच पडत आहे. सुट्ट्या पैशांमध्ये वाढ होत असल्याने त्याचे व्यवस्थापन करणे अवघड ठरत आहे. बेस्टकडे दररोज १० ते १२ लाख रुपयांची नाणी जमा होतात. दुसरीकडे इतरत्र सुट्ट्या नाण्यांच्या कमतरतेच्या तक्रारी असतात. म्हणूनच बेस्टने सुट्ट्या पैशांचे वितरण करण्यासाठी आवाहन केले आहे. त्यानुसार, ज्यांना चिल्लर हवी आहे त्यांच्यासाठी सर्व बस आगारात व्यवस्था करण्यात आली आहे.

काही महिन्यांपासून बेस्टच्या खजिन्यात पाच, दहा रुपयांच्या नाण्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. ही जादा सुट्ट्या नाण्यांची अडचण संपुष्टात आणण्यासाठी बेस्टने नवीनच कल्पना लढवली आहे. त्यांनी थेट ही चिल्लर सर्व बसडेपोंमध्ये सुट्ट्यांची निकड असलेल्यांसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.बेस्ट उपक्रमात सुट्ट्या नाण्यांचा दुष्काळ ते सुकाळ असा उलटाच प्रवास सध्यातरी घडू लागला आहे. बेस्टने किमान तिकीट ५ रु. करण्याचा घेतलेला निर्णय प्रवासीसंख्येत वाढीस पूरक ठरला आहे. त्याजोडीलाच बेस्टकडे सुट्ट्या नाण्यांचा खच पडू लागला आहे. गेल्या 

बेस्टच्या मुंबईतील २७ बस आगारांतील तिकीट, रोख विभागात सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत सुट्टी नाणी आणि नोटा वितरित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून इतर कोणत्याही दिवशी ही सुविधा उपलब्ध केल्याचे बेस्टने स्पष्ट केले आहे.
 
Web Title : Holiday Coin Expenses to the Best

संबंधित बातम्या

Saam TV Live