उद्यापासून मिळणार घरपोच दारू पण 'या शहारांना' थोडं थांबव लागणार  

उद्यापासून मिळणार घरपोच दारू पण 'या शहारांना' थोडं थांबव लागणार  

मुंबई: आता उद्यापासून ऑनलाईन दारू मिळणार आहे. पण ही दारू घरपोच जरी असली तरी  मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूर सारख्या शहरातील लोकांना घरपोच दारू मिळण्यासाठी थोड थांबाव लागणार आहे.  या जिल्ह्यातील संबंधित प्रशासनाला ऑनलाइन दारूविक्रीची परवानगी देणारे आदेशच मिळालेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना घरपोच दारू मिळण्यासाठी थोडं थांबावं लागणार आहे.

डिलिव्हरी बॉइज, वाहतूक व्यवस्था आदींची व्यवस्था करण्यासाठी दोन दिवसांचा तरी अवधी जाणार असल्याने प्रत्यक्षात उद्या गुरुवारपासूनच ऑनलाइन मद्यविक्री सुरू करण्यात येणार होईल, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. पंजाब, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडनंतर महाराष्ट्रात ऑनलाइन मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. दारूच्या दुकानांसमोर होणारी गर्दी आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा उडणारा फज्जा या पार्श्वभूमीवर ऑनलाइन मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. 

ऑनलाइन दारूविक्रीची परवानगी देणारे आदेश न मिळाल्याने या शहरांतील दारूची दुकाने अद्याप बंद आहेत. ठाणे, औरंगाबाद आणि नागपूरमधील करोनाची वाढती संख्या पाहता या शहरांमध्ये ऑनलाइनद्वारे दारूविक्री करण्याच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. मात्र, या शहरांमधून दारूविक्रीतून सर्वाधिक महसूल मिळत असल्याने या शहरातही ऑनलाइन दारूविक्रीला परवानगी मिळावी म्हणून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ऑनलाइन दारूविक्रीस परवानगी देणारं परिपत्रक सरकारने जारी केलं आहे. मात्र मुंबई, ठाणे, नागपूर आणि औरंगाबादसह आणखी काही शहरांतील प्रशासनाला अद्याप ऑनलाइन दारूविक्री करण्याची परवानगी देणारे आदेश मिळालेले नाहीत. मात्र, महसूलाच्या दृष्टीने येत्या तीन ते चार दिवसांत या शहरांमध्येही घरपोच दारूविक्रीला परवानगी देणारे आदेश दिले जातील, असं सूत्रांनी सांगितलं. 

WebTitle ::  Home-made liquor will be available from tomorrow, but 'these cities' will have to stop for a while

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com