गृहमंत्री अनिल देशमुखांची राष्ट्रवादीकडू पाठराखण, पुढे काय होणार?

साम टीव्ही
सोमवार, 22 मार्च 2021

गृहखात्यात भ्रष्टाचाराची बजबजपुरी?
'भ्रष्ट कारभारामुळंच जैस्वाल प्रतिनियुक्तीवर'

गृहखात्यातल्या देशमुखीवर फडणवीसांचा हल्लाबोल
 

 

 

विरोधी पक्षांनी अनिल देशमुखांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हं निर्माण केलंय. परमबीर सिंह यांच्याप्रमाणं माजी पोलिस महासंचालक सुबोध जैसवाल यांनी महासंचालकपद सोडल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

अनिल देशमुखांचं काय होणार? देशमुखांच्या मंत्रिपदाचा दिल्लीत फैसला?

परमबीरसिंहांच्या लेटरबॉम्बनं राज्यात खळबळ माजलीय. या लेटरबॉम्बच्या निमित्तानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  गृहखात्यातल्या अनागोंदीवर कडाडून टीका केलीय. गृहखात्यातल्या भ्रष्टाचारावर बोलणारे परमबीरसिंह हे पहिले अधिकारी नाहीत असा त्यांनी दावा केलाय. गृहखात्यात बदल्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळं सुबोध जैस्वाल हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्याचा दावा त्यांनी केलाय.

 शरद पवार हे महाविकास आघाडीचे निर्माते आहेत त्यामुळं ते या सरकारला पाठिशी घालत आहेत असा आरोपही फडणवीसांनी केलाय.

 अनिल देशमुख यांची पक्षानं पाठराखण केली असली तरी भाजप मात्र देशमुखांच्या राजीनाम्यावर ठाम आहे.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live