औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना गृहमंत्र्यांचा इशारा...

रोहिदास गाडगे
रविवार, 2 मे 2021

चाकण औद्योगिक क्षेत्रातील असणाऱ्या कंपन्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या कंपन्यामधील निर्बंध पाळण्याची जबाबदारी त्या उद्योगाच्या मालकांनी पाळणे बंधनकारक आहे, अशी जाणीव राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी करुन दिली आहे

पुणे : चाकण Chakan औद्योगिक क्षेत्रातील असणाऱ्या कंपन्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना Corona रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या कंपन्यामधील निर्बंध पाळण्याची जबाबदारी त्या मालकांनी पाळणे बंधनकारक आहे. यामुळे ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील Dilip Walse Patil यांनी आवाहन केले आहे. Home Minister Dilip Walse Patil warns industrialists 

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या रोखण्यासाठी राज्याचे ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ग्रामीण भागात सुरू असलेल्या औद्योगिक वसाहतीतल्या उद्योजकांनी त्यांनी निर्बंध पाळत कामगारांची सोय केली पाहिजे, असे वळसे पाटील यांनी यावेळी बैठकीत सांगितले. या आढावा बैठकीत माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील Shivaji Adhalrao Patil, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख Abhinav Deshmukh, जिल्हा परिषद मुख्यधिकारी आयुष प्रसाद Ayush Prasadउपस्थित होते. 

निवडणूक निकालांबाबत बोलताना ते म्हणाले, "या निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार प्रचार करूनही त्यांना मतदारांनी नाकारले असल्याचे  दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या Bengal निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष NCP शरद पवार Sharad Pawar यांनी ममता दिदींना Mamta Banerjee शुभेच्छा देखील दिल्या आहेत," बंगालच्या निवडणुकी नंतर महाराष्ट्रात चित्र बदलेल, असे विरोधख कोणत्या आधारे म्हणतायत हे त्यांनाच माहीत, असा टोलाही वळसे पाटील यांनी लगावला.

Edited By- Digambar Jadhav
 


संबंधित बातम्या

Saam TV Live