पोलीस उपनिरीक्षक परीक्षार्थींना प्रशिक्षणास पाठवणार

Police training(3).jpg
Police training(3).jpg

राजगुरुनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक PSI सरळसेवा परीक्षा-२०१८ आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा-२०१७ मधील एकूण पात्र ७३७ उमेदवारांना जून २०२१ पासून मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय गृहमंत्री Home Minister दिलीप वळसे पाटील Dilip Walse-Patil यांनी जाहीर केला आहे. Home Minister's Decision to send PSI Examinees For Training

सदरचे प्रशिक्षण हे कोरोना Corona परिस्थितीच्या अधिन राहून तसेच राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांच्या अधिन राहून सुरु करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2017 मधील 322 उमेदवारांचे प्रशिक्षण सत्र दि.21 जूनपासून सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा 2018 मधील एकूण 387 उमेदवार आहेत. Home Minister's Decision to send PSI Examinees For Training

तसेच 2017 च्या प्रतीक्षा यादीतील 22 उमेदवार व सत्र क्रमांक 118 मधील मुदतवाढ मिळालेले 6 उमेदवार अशा एकूण 415 उमेदवारांचे मूलभूत प्रशिक्षण 24 जूनपासून सुरु करण्याचे गृह विभागाने प्रस्तावित केले आहे.त्यामुळे पात्र उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com