मासिक पाळी दरम्यान वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय; जाणून घ्या

साम टीव्ही ब्युरो
शनिवार, 29 मे 2021

मासिक पाळी ही फक्त मुली-स्त्रीयांची समस्या नसून ही एक सामाजिक समस्या आहे .

मासिक पाळी ही फक्त मुली-स्त्रीयांची समस्या नसून ही एक सामाजिक समस्या आहे. मासिक पाळी म्हणजे चार-चौघात न बोलण्याचा विषय. त्यामुळे पाळीविषयी खुलेआम चर्चाच होत नाही.  आपण सर्वजण जन्माला आलो आहोत ते याच मासिक पाळीच्या कृपेमुळेच. आणि त्यालाच आपण अपवित्र, अशुद्ध आणि विटाळ मानतो. मासिक पाळीमध्ये स्त्रियांना ओटीपोटात, खालच्या मागच्या आणि मांडीच्या सभोवताल अस्वस्थता जाणवणे हे  सामान्य आहे. आपल्या गर्भातील स्नायू संकुचित होतात त्यामुळे विश्रांती घेणे गरजेचे असते. काही स्त्रियांना मळमळ, डोकेदुखी, आणि उलट्या होतात. काहींना मासिक पाळीच्या दिवसात तीव्र वेदना होतात. काही कारणे आहेत जे मासिक पाळीच्या वेदना वाढवितात . मासिक पाळी आल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना स्त्रियांना होतात, या वेदनेपासून मुक्त होण्यासाठी हे घरगुती उपचार  करून पाहा.(Home remedies to reduce pain during menstruation Find out)

श्रीलंकेत ड्रॅगनचा हस्तक्षेप, साइन बोर्डवर चिनी भाषेने घेतली जागा; वाचा सविस्तर

मासिक पाळी च्या दरम्यान  वेदना कमी करू शकेल असे  6 घरगुती उपचार 

1) उष्णता
आपल्या पोटावर गरम पाण्याची बाटली किंवा हीटिंग पॅड ठेवल्याने स्नायू शिथिल झाल्याने पोट दुखणे कमी होते. उष्णता गर्भाशयाच्या स्नायूंना मदत करते, ज्यामुळे आपल्यला आराम मिळतो.

2) जंक फूडपासून दूर रहा
यावेळी आपली चिप्स आणि कुकीजसाठी तळमळ होते. परंतु, यावेळी ते आपल्या वेदना कमी करणार नाहीत अजुन त्रास देतात.  त्याऐवजी, तुम्ही तुमच्या शरीरात निरोगी रहाण्यासाठी ओमेगा 3, फळे, शेंगदाणे, पातळ प्रथिने, भाज्या आणि संपूर्ण धान्य असा समृध्द आहार घ्यावा.

3) व्यायाम
 मासिक पाळी दरम्यान व्यायाम करणे आपल्याला नको वाटते, पण यावेळी काही हलके व्यायाम खरोखर फायदेशीर ठरतील. आपण हलका व्यायाम करू शकता बॉडी स्ट्रेच करणं किंवा फिरायला जाऊ शकता किंवा थोडासा योगा  करू शकता.

पालकमंत्री कचरा कर त्वरित रद्द करा; डोंबिवली शहरात सर्वत्र झळकले बॅनर

4) तिळाच्या तेलाने मालिश करणे

20 मिनिटे हळुवार हातांनी आपल्या पोटाची तीळाच्या तेलानी मालिश केल्याने देखील वेदना कमी होण्यास मदत होते.

5) चांगली झोप घ्या
मासिक पाळीच्या दरम्यान  स्वत:ला आराम देण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे चांगली झोप घेणे. त्यामुळे वेदनेकडे लक्ष लागत नाही. 

6) आले आणि मिरपूड चहा पिणे 

आले आणि काळी मिरी आपलं वजन कमी करण्यासाठी आणि अस्वस्थतेसाठी एक मधुर गरम पेय आहे. एक वाटी पाणी उकळवा आणि थोडासा आलं खिसून त्यात काळी मिरी घाला आणि ते 5 मिनिटे उकळवा आणि ते गरम गरम प्या.

हे देखील पाहा


संबंधित बातम्या

Saam TV Live