गुंडाची मिरवणूक, राज्यात राज्य कुणाचं?

साम टीव्ही
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा जेल ते पुणे अशी  मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत शेकडो कारचा ताफा होता. त्यामुळे राज्यात गुंडांचं उदात्तीकरण सुरु आहे का असा प्रश्न निर्माण झालाय.

कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा जेल ते पुणे अशी  मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत शेकडो कारचा ताफा होता. त्यामुळे राज्यात गुंडांचं उदात्तीकरण सुरु आहे का असा प्रश्न निर्माण झालाय.

ही मिरवणूक नेत्याची नाही. ही मिरवणूक अभिनेत्याची नाही. ही मिरवणूक आहे कुख्यात गुंड गजा मारणेची. पुण्यातला गुंड गजा मारणे खून प्रकरणात नवी मुंबईच्या तळोजा जेलमध्ये होता.

खून खटल्यातून सुटका झाल्यानंतर गजा मारणेची तळोजा जेलमधून अक्षरक्षः मिरवणूक निघाली. गजा मारणेच्या कारमागं तब्बल ३०० कारचा ताफा होता. गजा मारणे नेत्यासारखा सनरुफमधून बाहेर येत अभिवादनाचा स्वीकार करत होता.

गजा मारणेची ही मिरवणूक नवी मुंबई ते पिंपरी चिंचवड़पर्यंत चाचली. पण ना त्याला तळोजा पोलिसांनी हटकलं, ना हायवे पोलिसांनी गृहराज्यमंत्र्यांनी यावर फक्त कोरडा संताप व्य़क्त केला. गुडापुंडांचं उदात्तीकरण समाजासाठी घातक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

 गजा मारणेसारख्या गुंडप्रवृत्तींचं उदात्तीकरण करण्याऐवजी ती ठेचून काढणं गरजेचं आहे. पोलिसांसोबतच सामान्य लोकांनाही गुंडापुंडांना थारा देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live