नवे वर्ष देशवासियांसाठी आनंददायी ठरेल : PM मोदी

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 1 जानेवारी 2020

NaMo 2.0 ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात कलम ३७० बाबतचा ऐतिहासिक निर्णय, करतारपूर कॉरिडोर उद्घाटन, भारताची पहिली सेमी-हाय-स्पीड ट्रेन यासह सरकारच्या महत्त्वपूर्ण कामगिरी दाखवण्यात आला आहे. मोदींनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. एका नेटकऱ्याने मोदी सरकार युवांच्या मनातील भावना ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यात सक्षम असल्याची भावना व्यक्त केली होती.

मोदींनी NaMo 2.0 नावाच्या ट्विटच्या प्रतिक्रिया देताना आगामी वर्षात देशात अनेक अमुलाग्र बदल घडतील, असा विश्वास व्यक्त केलाय.  नव्या वर्षाच्या स्वागतासाठी देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे वर्ष देशवासियांसाठी आनंददायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या विकासासाठी नवीन वर्ष लोकांना सशक्त आणि मजबूत बनवेल, असे ट्विट मोदींनी केले आहे. 

 

NaMo 2.0 ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात कलम ३७० बाबतचा ऐतिहासिक निर्णय, करतारपूर कॉरिडोर उद्घाटन, भारताची पहिली सेमी-हाय-स्पीड ट्रेन यासह सरकारच्या महत्त्वपूर्ण कामगिरी दाखवण्यात आला आहे. मोदींनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. एका नेटकऱ्याने मोदी सरकार युवांच्या मनातील भावना ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यात सक्षम असल्याची भावना व्यक्त केली होती. भविष्यातील भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणांच्या कौशल्याची पारख केली जाते, असाही उल्लेख यात करण्यात आला होता. या ट्विटवरही मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Web Title: hopeful 2020 marks continuation of people powered efforts to transform india pm modi
 


संबंधित बातम्या

Saam TV Live