14 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान- वार मंगळवार
14 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य
14 सप्टेंबर 2021 - राशिभविष्यSaam Tv

दिनमान -

मेष : आर्थिक लाभ होतील. गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मिथुन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

तूळ : हितशत्रूंवर मात कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

वृश्‍चिक : अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

धनू : कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आध्यात्माकडे कल राहील.

कुंभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक लाभ होतील.

मीन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com