2 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य
दिनांक 2 सप्टेंबर 2021 वार गुरुवार आजचे दिनमान-Saam Tv

2 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 2 सप्टेंबर 2021 वार गुरुवार आजचे दिनमान

आजचे दिनमान

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मिथुन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कर्क : वाहने सावकाश चालवावीत. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

कन्या : सामाजिक व राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान लाभेल.

तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

धनु : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

मकर : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : काहींची वैचारिक प्रगती होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com