18 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य

दिनांक 18 नोव्हेंबर 2021 वार गुरवार आजचे दिनमान
18 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य
18 नोव्हेंबर 2021- राशिभविष्यSaam Tv

मेष : दैनंदिन कामे यशस्वी होतील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

वृषभ : काहींची अध्यात्मिक प्रगती होईल. खर्च वाढणार आहेत.

मिथुन : प्रवासाचे योग येतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.

कर्क : प्रवास सुखकर होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक रहाणार आहे.

सिंह : जिद्द वाढेल. चिकाटीने कार्यरत रहाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कन्या : मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत.

तूळ : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आत्मविश्‍वासाच्या जोरावर येणार्‍या अडचणींवर मात करावी लागेल.

वृश्‍चिक : हितशत्रूंवर मात कराल. आरोग्य उत्तम राहाणार आहे.

धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रवासाचे योग येतील.

मकर : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा इतरांवर प्रभाव राहील.

कुंभ : प्रवासाचे योग येतील. मनोबल उत्तम राहील.

मीन : महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com