20 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य

दिनांक 20 नोव्हेंबर 2021 वार शनिवार आजचे दिनमान
20 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य
20 नोव्हेंबर 2021- राशिभविष्यSaam Tv

मेष : नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. व्यवसायात तुम्ही नवीन प्रयोग करू शकाल.

वृषभ : थोरामोठ्यांच्या सहकार्याची फार अपेक्षा करू नका. उत्साह, उमेद वाढेल.

मिथुन : कौटुंबिक जीवनात, नोकरी, व्यवसायात जबाबदारी वाढणार आहे. महत्वाची कामे पुढे ढकलावीत.

कर्क : आर्थिक लाभ होतील. तुमचे निर्णय, अंदाज अचूक ठरणार आहेत.

सिंह : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. व्यवसायात वाढ होवू शकेल.

कन्या : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.

तूळ : कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना चांगली संधी मिळेल. विरोधकावर मात कराल.

वृश्‍चिक : काहींना प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभणार आहे.

धनु : तुमचा स्वभाव आक्रमक बनणार आहे. बोलण्यामध्ये कटूता टाळावी.

मकर : तुमचे अंदाज व निर्णय अचूक येतील. आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे.

कुंभ : तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल.

मीन : तुमचा दबदबा वाढेल. तुमच्या कर्तृत्वाला संधी मिळेल.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com