24 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य

दिनांक 24 नोव्हेंबर 2021 वार बुधवार आजचे दिनमान
24 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य
24 नोव्हेंबर 2021- राशिभविष्यSaam Tv

मेष : नोकरी, व्यवसायाचा प्रश्‍न सोडवू शकाल. प्रवास सुखकर होतील.

वृषभ : दुपारनंतर नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेली कामे पूर्ण करू शकाल.

मिथुन : आत्मविश्‍वासाच्या जोरावर अनेक कामे यशस्वी कराल. दैनंदिन कामे पूर्ण होतील.

कर्क : सौख्य व समाधान लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल.

सिंह : हितशत्रूंवर मात करू शकाल. खर्च वाढणार आहेत.

कन्या : अनेकांशी सुसंवाद साधाल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

तूळ : नोकरीमध्ये उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील.

धनु : महत्त्वाच्या तसेच दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

कुंभ : गडी, नोकरचाकर, कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. विरोधक व हितशत्रूंवर मात कराल.

मीन : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com