Weekly Horoscope: ..या राशींना ठरेल हा आठवडा भाग्याचा

जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: ..या राशींना ठरेल हा आठवडा भाग्याचा
Weekly Horoscope: ..या राशींना ठरेल हा आठवडा भाग्याचा- Saam TV

(श्रीराम भट)

मेष : सप्ताह भरणी नक्षत्रास अतिशय आश्‍वासक अशी फळे देईल. थोरामोठ्यांच्या गाठीभेटींतून आश्‍वासक! पती वा पत्नीच्या सुवार्तांतून जल्लोष. मंगळ-शुक्राची गुलाबी थंडी राहीलच. ता. 26 ची शनिवारची एकादशी हृद्य प्रसंगातून नेणारी. अश्‍विनी व्यक्तींनी कुसंगत जपावी. पोट सांभाळा.

वृषभ : सप्ताहाची सुरुवात रोहिणी नक्षत्रास विशिष्ट मुलाखती यशस्वी करणारी. विशिष्ट सरकारी कामांतून यश मिळेल. ता. 24 चा गुरुवार शुभ ग्रहांच्या पाठबळातून शुभलक्षणी. मृग नक्षत्रास व्यावसायिक मोठी प्राप्ती. कृत्तिका नक्षत्रास ता. 22 ची संध्याकाळ घरात कटकटींची. लहान मुलांना जपा.

मिथुन : मंगळ-शुक्राचे ग्रासकोर्ट राहीलच. सप्ताहाची सुरुवात "बहारो फूल बरसावो' अशीच राहील. ता. 21 चा सोमवार मोठा शुभलक्षणी. नोकरीतील आत्मविश्‍वास वाढेल. आर्द्रा व्यक्तींनी आर्थिक व्यवहारात कायदेशीर गोष्टी पाळाव्यात. प्रलोभने टाळावी. बाकी पुनर्वसू व्यक्तींना शनिवार दैवी प्रचितीचा.

कर्क : सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना चांगलीच उभारी देईल. बाकी काहींना सप्ताह कुसंगतीतून अडचणीत आणणारा. जुगारी, व्यसनी मित्र टाळा. पुष्य व्यक्तींनी ता. 25 व ता. 26 हे दिवस जपलेच पाहिजेत. नका मारू शॉर्टकट. आश्‍लेषा व्यक्तींना उद्याचा सोमवार घरात सुवार्तांतून प्रसन्न. वास्तुयोग.

सिंह : आजची संकष्टी मोठ्या शुभशकुनाची. तरुणांचे उत्तम कलाप्रदर्शन. आजचा सोमवार व्यावसायिक वसुलीचा. पूर्वा नक्षत्र मोठी धावसंथ्या रचेल. मघा नक्षत्रास ता. 25 व ता. 26 फेब्रुवारी 2022 हे दिवस मित्रांशी वाद घडवतील. संयम ठेवा. बाकी उत्तरा नक्षत्रास शनिवार काल्पनिक भयभीतीचा.

कन्या : सप्ताहाची सुरुवात बॅटिंग फिल्ड ठेवेल. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा कराच. सप्ताह गृहिणींना उत्तमच. कोडकौतुक होईल. चित्रा नक्षत्रास घरातील प्रिय व्यक्तीच्या सुवार्ता धन्य करतील. सप्ताहाच्या शेवटी हस्त नक्षत्रास शनिवार जागरणाचा. घरातील वृद्धाची चिंता.

तूळ : घरातील तरुणांचे भाग्योदय होतील. विशाखा नक्षत्रास 22 चा दिवस महत्त्वाच्या कामांतून यश देणारा. भावाबहिणींचे भाग्योदय. स्वाती नक्षत्रास ता. 24 चा गुरुवार व्यावसायिक वसुलीचा. कोर्टप्रकरणात यश. शनिवार तीर्थाटनाचा.

वृश्‍चिक : सप्ताह मंगळ-शुक्राच्याच ताब्यात राहील. सतत सुवार्तांतून चर्चेत राहाल. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट व्यावसायिक प्राप्तीचे रेकॉर्ड मोडेल. ज्येष्ठा व्यक्ती अतिशय फॉर्ममध्ये येतील. अनुराधा व्यक्तींना सप्ताहाचा शेवट घरात मंगलकार्ये ठरवणारा. विशाखा व्यक्तींना शनिवार स्त्रीविरोधी.

धनु : सप्ताहात ग्रहांचे फिल्ड तथाकथित साडेसातीच्या पार्श्‍वभूमीवर इतके काटेकोर राहणार नाहीये! अर्थातच सप्ताहाची सुरुवात -- छानच. मूळ नक्षत्रास ता. 22 फेब्रुवारी 2022 चा दिवस छान गतिमान राहील. तरुणांनो फायदा घ्या. पूर्वाषाढा व्यक्तींना सप्ताहाचा शेवट छान चंद्रबळाचा. शनिवार दैवी प्रचितीचा.

मकर : सप्ताहात चंद्रबळाच्या पार्श्‍वभूमीवर विशिष्ट लाभ होतील. आजची संकष्टी शुभशकुनी. श्रवण नक्षत्रास उद्याचा सोमवार व्यावसायिक उलाढाली यशस्वी करणारा. बेरोजगारांना संधी चालून येतील. ता. 24 चा गुरुवार धनिष्ठा नक्षत्रास फ्लॅशन्यूजमध्ये आणेल. शनिवार मौजमजेचा. मात्र रस्त्यावर जपा.

कुंभ : राशीचा गुरू बोनस शेअर्स देणारा. पूर्वाभाद्रपदा व्यक्ती सप्ताह गाजवणार आहेत. उद्याच्या सोमवारी धमाल उडवाल. चमत्कार घडतील. शततारका नक्षत्रास सप्ताहाचा शेवट परिचयोत्तर विवाहयोगाचा. धनिष्ठा नक्षत्रास उद्याचा सोमवार धनवर्षावाचा. कायदेशीर यश.

मीन : आजच्या संकष्टीच्या चंद्रोदयी सुवार्तांतून प्रसन्न राहाल. विवाहस्थळे चालून येतील. रेवती व्यक्तींनी सकारात्मक राहावे. श्रीगणेशावर श्रद्धा ठेवा. उत्तराभाद्रपदा नक्षत्रास उद्याचा सोमवार व्यावसायिक मार्केटिंग यशस्वी करणारा. सप्ताहाचा शेवट चंद्रबळातून मोठे चमत्कार घडवणारा. मात्र जुगार टाळा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com