VIDEO | अंगावर शहारा आणणारा अपघात

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

गाड्या चालवता येत नसतील तर लोकं गाड्या चालवतात कशाला? समोरून कुणी येतंय जातंय का ? हे डोळे उघडे ठेऊन लोकं बघत का नाहीत ? तुमच्या एका चुकीने कुणाचं आयुष्य उध्वस्त होईल याची फिकीर लोकांना नसतेच का ? आता 'ती' कशी आहे. आहे का नाही इथवर.. एक ना अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात  आल्याशिवाय राहणार नाही. त्या माणसाला धरून बदडायला पाहिजे हे सगळ्यात आधी तुमच्या डोक्यात येईल. कारण, ही घटना पण तशीच आहे.. खालचा व्हिडीओ एकदा पाहा म्हणजे तुहाला समजेल आम्ही असं का म्हणतोय ? 
 
सदर दुर्घटना ही मंगळवारी (तारीख ५) घडली आहे. पनवेलच्या कळंबोलीत साईनगर वसाहतीतील एका सोसायटीच्या आवारात ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे ही मुलगी अवघ्या 6 वर्षांची आहे. सध्या या मुलीला कामोठे इथल्या MGM इस्पितळात दाखल करण्यात आलंय. गंभीर बाब म्हणजे या मुलीला 17 ठिकाणी फ्रॅक्चर झालंय. दरम्यान या घटनेत कोणतीही तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आलेली नाही. 

या गाडीवर 'L' म्हणजेच लर्निंग अशी पाटी दिसतेय. अशात जर चालक शिकाऊ असेल तर मुळात शेजारी कुणीतरी असा व्यक्ती हवा ज्याला गाडी नीट चालवता येते किंवा ज्याच्याकडे गाडी चालवण्याचा पक्का परवाना आहे . पण तसं कुणीच या गाडीत नीट दिसत नाहीये. मग अशा लोकांचं आता करायचं काय हा खरा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतंय? कळवा कमेंटमध्ये.  

WebTitle : horrible accident took place in panvel kalamboli area

संबंधित बातम्या

Saam TV Live