कल्याण मध्ये जीव वाचवण्यासाठी रुग्णांना खुर्चींवर झोपवून ऑक्सिजन

प्रदीप भणगे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

कोरोनाचं थैमान इतकं भयानक वाढलंय की त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती शब्दांमध्ये सांगता येणार नाही. कल्याणमध्ये तर प्रचंड भयानक परिस्थिती आहे. इथे रुग्णांना बेड मिळणं खूप कठीण झाल आहे.

कल्याण  : कोरोनाचं थैमान इतकं भयानक वाढलंय की त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती शब्दांमध्ये सांगता येणार नाही. कल्याणमध्ये तर प्रचंड भयानक परिस्थिती आहे. इथे रुग्णांना बेड मिळणं खूप कठीण झाल आहे. सरकारी असो किंवा खासगी, सर्वच रुग्णालये फुल झाली आहेत. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. Hospiital Beds Not Available in Kalayn

अशा परिस्थितीत अत्यवस्थ किंवा ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना महापालिका रुग्णालयात पेसेजमध्ये असलेल्या खुर्च्यांवर झोपवून ऑक्सिजन दिला जातोय. ही भयानक परिस्थिती बघून मनाला चटका बसेल. पण हे वास्तव नाकारता येणार नाही.कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे.खाजगी असो किंवा महापालिका रुग्णालय, रुग्णांसाठी बेडच नाही.

उस्मानाबादमध्ये एका दिवसात १९ जणांवर अंत्यसंस्कार

तर खाजगी रुग्णालयात इंजेक्शन नाहीत. सध्याच्या घडीला परिस्थिती इतकी विदारक आहे की, कल्याणच्या रुक्मीणीबाई रुग्णालयातील पॅसेज मधील खुर्च्यांवर आता रुग्णांना झोपवून ऑक्सिजन दिला जात आहे. हे चित्र पाहून सगळ्यांनाच धक्का बसेल.
Edited By - Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live