आजपासून राज्यातील हॉटेल्स, रेस्ट्रॉरंट  आणि बार सुरु, पाहा काय असतील नियम?

साम टीव्ही
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020


कोरोनाची लक्षण नसलेल्यांना उपहारगृह आणि बारमध्ये प्रवेश दिला जाणार आहेत. उपहारगृह आणि बारमध्ये प्रवेश करताना प्रत्येकाची तपासणी, फक्त 50 टक्के आसनक्षमतेचा वापर करणे असे नियम यासाठी घालण्यात आलेत.

राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट  आणि बार आजपासून सुरु होतायत. कोरोनाचं संकट उद्धभवल्यानंतर राज्यातील हॉटेल्स, रेस्टरंट आणि बार बंद ठेवण्यात आले होते. मिशन अनलॉक अंतर्गत साडेपाच महिन्यानंतर राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आलीय. यासाठी राज्य सरकारनं नियमावली जाहीर केलीय.

हॉटेल्स, रेस्टॉरंट,बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे अनेक नियम पाळावे लागणार आहे. दरम्यान, कोरोनाची लक्षण नसलेल्यांना उपहारगृह आणि बारमध्ये प्रवेश दिला जाणार आहेत. उपहारगृह आणि बारमध्ये प्रवेश करताना प्रत्येकाची तपासणी, फक्त 50 टक्के आसनक्षमतेचा वापर करणे असे नियम यासाठी घालण्यात आलेत.

हॉटेल्स, रेस्टॉरंटसाठी काय नियमावली आहे हे पाहुयात -


संबंधित बातम्या

Saam TV Live