जगातील 18 देश आणि बेटांनी कसं काय रोखलं कोरोनाच्या राक्षसाला...?

साम टीव्ही
गुरुवार, 14 मे 2020
  • जग कोरोनाच्या संकटात, 18 देश मात्र आनंदात
  • जगातील 18 देश आणि बेटांनी रोखलं कोरोनाच्या राक्षसाला
  • 18 देशांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही

या 18 देशांमध्ये कोरोनानं अद्याप पाऊलही ठेवलेलं नाहीय. कोरोनाच्या राक्षसाला वेशीवरच कसं अडवलं या देशांनी आणि कोणते आहेत हे 18 देश.

 कोरोनाचं संकट जगाच्या मानगुटीवर बसलंय. मात्र पृथ्वीवर असे 18 देश आणि बेटं आहेत ज्यांनी कोरोनाच्या राक्षसाला आपल्या देशात पायही ठेवू दिलेला नाहीय. जगभरातील बहुतांश देश लॉकडाऊनमध्ये असताना या 18 देशांमध्ये लॉकडाऊनची बंधनं घातली गेलेली नाहीयत.

कोरोनाला रोखणारे 18 देश
किरिबाटी, अमेरिकन समोआ, लेसोथो, मार्शल आयर्लँड या देशांमध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाहीय. त्याचप्रमाणे मिक्रोनीशिया, नाऊरू, पलऊ, समोआ, सोलोमन आयर्लँड, टोंगा, टुवालू या देशांनीही कोरोनाला वेशीवरच रोखलंय. वानुआतू, टोकेलाऊ, निऊ, द कुक आयर्लँड, सालमन, तुर्केमेनिस्तान आणि नॉर्थ कोरिया या देशातही कोरोनाने अद्याप पाय ठेवलेला नाहीय.
त्यामुळे या 18 देशांनी केलेल्या उपाययोजना जगासाठी महत्त्वाच्या आहेत.

कसं रोखलं 18 देशांनी कोरोनाला?
जगभरात कोरोनाचं संकट घोंगावू लागल्यावरच या देशांनी कडक उपाययोजना केल्या. परदेशी नागरिकांना देशात येण्यास बंदी घालण्यासोबतच देशातील नागरिकांनाही देशाबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. इतर देशांशी संपर्क होऊ शकतील अशी सर्व आंतरराष्ट्रीय वाहतूक आधीच बंद करण्यात आली.

त्यामुळे कोरोनाला वेशीवरच रोखण्यात या देशांना यश आलंय. या देशांनी जे केलंय ते इतर दशांनी वेळीच केलं असतं तर, कदाचित कोरोनाच्या राक्षसाचं जागतिक थैमान रोखता आलं असतं.


संबंधित बातम्या

Saam TV Live