पावसामुळे नुकसान झालेल्या बळीराजाला सरकारनं जाहीर केलेली मदत कशी आणि कुणाला मिळणार वाचा सविस्तर...

साम टीव्ही
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

पावसामुळे शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालं, शेतात उभी राहिलेली पिकं वाहून गेली... जी टिकली जागच्या जागी कुजून गेली... गुरं-ढोरं बुडून मेली... शेतकरी पोरका झाला... म्हणून राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. ती मदत नेमकी कशी कुणाला मिळणार हेही महत्त्वाचं आहे.

कशी मिळणार शेतकऱ्यांना मदत
अतिवृष्टीने दगावलेल्या व्यक्‍तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत मिळणार असून दुधाळ जनावर दगावल्यास 30,000, मेंढी, बकरी, डूक्‍कर दगावल्यास 3,000 रुपयांची मदत मिळणारेय. त्याचप्रमाणे दगावलेल्या प्रत्येक कोंबडीमागे 50 रुपयांची मदत जाहीर झालीय. सखल भागातील घर पडल्यास 95,100, तर दुर्गम भागातील घर पडल्यास 1,01,900 रुपये मदत मिळणारेय.

कोरोनाच्या संकटात सगळे उद्योग बंद असताना आपला शेतकरी राजा मात्र रानात घाम गाळत होता... म्हणून तर या संकटातही अन्नधान्याचा तुटवडा जाणवला नाही... मात्र परतीच्या पावसाने होत्याचं नव्हतं केलं. राज्य सरकारने आता शेतकऱ्यांना मदत जाहीर केलीय... त्यामुळे, पावसात भिजलेल्या आणि चिखलात रुतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live