तुम्ही रोज किती पाणी प्यायला पाहिजे? संशोधन काय सांगते?

तुम्ही रोज किती पाणी प्यायला पाहिजे? संशोधन काय सांगते?

पाण्याला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरिराला अन्ना बरोबरच पाण्याचीही तितकीच किंबहुना अन्ना पेक्षा जास्त गरज आहे. तज्ज्ञांकडून रोज आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्लाही देण्यात येतो. याबाबत 1945मध्ये अमेरिकेचे फूड ऍण्ड न्यूट्रिशन बोर्ड ऑफ नॅशनल रिसर्च कौन्सिलने ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या खाण्यातील कॅलरीजचे पचन करण्यासाठी एक लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला होता.याचा अर्थ असा की आपण जर दोन हजार कॅलरी खात असला तर,दोन लिटर पाणी पिले पाहिजे. मात्र, केवळ सतत पाणी पिणे योग्य नव्हे तर, भाज्या आणि दुसऱ्या पेय पदार्थांमधून सुद्धा मिळणाऱ्या पाण्याचा समावेश आहे.

पाण्याला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरिराला अन्ना बरोबरच पाण्याचीही तितकीच किंबहुना अन्ना पेक्षा जास्त गरज आहे. तज्ज्ञांकडून रोज आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्लाही देण्यात येतो. याबाबत 1945मध्ये अमेरिकेचे फूड ऍण्ड न्यूट्रिशन बोर्ड ऑफ नॅशनल रिसर्च कौन्सिलने ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या खाण्यातील कॅलरीजचे पचन करण्यासाठी एक लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला होता.याचा अर्थ असा की आपण जर दोन हजार कॅलरी खात असला तर,दोन लिटर पाणी पिले पाहिजे. मात्र, केवळ सतत पाणी पिणे योग्य नव्हे तर, भाज्या आणि दुसऱ्या पेय पदार्थांमधून सुद्धा मिळणाऱ्या पाण्याचा समावेश आहे. भाजीपाला आणि फळांमधून 98 टक्के पाणी आपल्याला मिळत असते.त्याचप्रमाणे न्यूट्रिशन फॉर गुड हेल्थ या पुस्तकात 1974 मधील मार्गरेट मैक्विलियम्स आणि फ्रेडरिक स्टेयर यांनी रोज आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.


भरपूर पाणी पिण्याचे फायदे

जास्त पाणी पिल्याने शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
पाणी पिण्याने आपल्याला डिहायड्रेशन होत नाही.त्याशिवाय मेंदू चांगल्याप्रकारे काम करतो.
आपण जर पर्याप्त स्वरूपात पाणी पिले तर कोणत्याही समस्येचे निराकरण करू शकतो.
नियमितपणे पाणी पिल्याने शारीरीक वजन नियंत्रणात ठेवू शकतो.
अमेरिकेच्या व्हर्जिनिया पॉलिटेक्‍निक इंस्टिट्युटच्या ब्रेंडा डेवी यांच्या म्हणण्यानुसार भरपूर पाणी पिण्यामुळे वजन कमी होते. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजची बारबरा रॉल्स हिच्या म्हणण्यानुसार आपण साध्या पाण्याऐवजी गोड पाणी पिले तर, त्वचा स्निग्ध राहते मात्र याबाबत शास्त्रज्ञांना अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही.
 

किती पाणी प्यावे?
भरपूर पाणी प्यावे असे आपण नेहमीच म्हणत असतो. तसेच कधी कधी शरिराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी आपण पितो. लंडनचे एक तज्ज्ञ ह्यू मॉन्टगोमरी यांच्या मते जे नागरिक उष्ण कटीबंधातील प्रदेशात राहतात त्यांना दोन लिटरपेक्षा अधिक पाणी पिणे गरजेचे आहे. त्याशिवाय ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या ऍडव्हायजरीच्या मते आपण रोज सहा ते आठ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. यामध्ये दूध, कॉफी आणि चहा या पेयांमधून सुध्दा शरिरात जाणाऱ्या पाण्याच्या अंश गृहित धरला जातो.


Web Title: how much you should drink water a day information in marathi
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com