वाचा, नेमकं कशा प्रकारे तुमचं वीज बिल कमी होईल?

साम टीव्ही
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं एक प्रस्ताव तयार केलाय. या प्रस्तावानंतर गेल्या वर्षीच्या वीज वापराची तुलना करून ग्राहकांना वीज बिल दिलं जाईल.

वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं एक प्रस्ताव तयार केलाय. या प्रस्तावानंतर गेल्या वर्षीच्या वीज वापराची तुलना करून ग्राहकांना वीज बिल दिलं जाईल. कोरोनाकाळात वीजबिलामुळे नागरिक प्रचंड हैराण झालेत.

राज्यातील सर्वच वीज ग्राहकांना यावर्षीच्या एप्रिल, मे आणि जून या महिन्यातील वीज वापर आणि याच महिन्यांसाठी 2019 साली केलेल्या वीज वापराची तुलना केली जाणार आहे. त्यानुसार जास्तीच्या वीज युनिटचा भार सरकार आपल्यावर घेईल. केवळ घरगुती वीज ग्राहकांनाच हा दिलासा मिळणारंय.

व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी हा निर्णय लागू नसेल. आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणारंय.

नेमकं कशा प्रकारे तुमचं वीज बिल कमी होईल पाहूयात


संबंधित बातम्या

Saam TV Live