एचआरसीटी मशीनमुळे होऊ शकतो कोरोनाची लागण?

Can HRCT Machine Spreads Corona
Can HRCT Machine Spreads Corona

औरंगाबाद : सिटी स्कॅन CT scan आणि एचआरसिटी HRCT टेस्ट करायची असेल, तर काळजी घ्या. एचआरसिटी मशीन तुम्हाला कोरोना Corona पाॅझिटिव्ह करू शकते. एचआरसिटी मशीनमुळे कोरोना वाढला आहे. एचआरसिटी मशीन ठरलं कोरोना सुपरस्प्रेडर. मशीनमुळे कोरोना प्रादुर्भाव वाढल्याचा अंदाज आहे. HRCT machines can infect you with corona

औरंगाबाद Aurangabad शहर कोरोनाचा हॉटस्पॉट Hotspot झाला आहे. कोरोनाच निदान करण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट आणि अँटिजेन Antigen टेस्ट केली जाते. तर कोरोनाने फुफ्फुसाचे किती नुकसान केले आहे. हे जाणून घेण्यासाठी सिटी स्कॅन आणि एचआरसिटी टेस्ट केली जाते. पण काही जण कोरोना टेस्ट करण्याआधीच एचआरसिटी टेस्ट करत आहेत. त्यामुळे कोरोनाचं निदान होत असलं तरी त्यातूनही कोरोनाचा फैलाव होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सिटी स्कॅन करताना चेंबरमध्ये ठेऊन त्याला जेव्हा सांगितलं जात, श्वास घ्या किंवा सोडा मग ते दाबून धरा. त्यावेळी रुग्णाच्या शरीरात काही विषाणू असलेच Virus तर ते चेंबर मध्ये जातात. त्यामुळे नंतरच्या रुग्णांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. HRCT machines can infect you with corona

कोरोना निदानासाठी एक विशिष्ट पद्धत आहे. ही पद्धतच जोपासली पाहिजे. नाहीतर ज्यांना कोरोना नाही त्यांना ही नाहक कोरोनाच्या मगर मिठीत ढकलण्याचं काम काही डॉक्टरांकडून केलं जात आहे. सरसकट एचआरसिटी टेस्ट सुरु राहिल्यास शासकीय पातळीवर त्यासाठी नियमावली जारी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By- Digambar Jadhav        

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com