16 दिवसात लाखो लिटर बेकायदा दारू जप्त

16 दिवसात लाखो लिटर बेकायदा दारू जप्त

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे. 

पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा दुसऱ्या; तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

निवडणुकीच्या काळात अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके नेमली आहेत. या पथकांनी 21 सप्टेंबरपासून आतापर्यंत अवघ्या 14 दिवसांत पुणे जिल्ह्यातून 59 लाख 43 हजार 995 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. ठाण्यातून 56 लाख 85 हजार 895 लिटर, नागपूरमधून 52 लाख 64 हजार 616 लिटर आणि पालघर जिल्ह्यातून 52 लाख 15 हजार लिटर अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. 

'दारूबंदी'च्या जिल्ह्यांतही कारवाई 

दारूबंदी असलेल्या वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतही मोठा अवैध मद्यसाठा सापडला आहे. वर्ध्यातून जिल्ह्यातून 15 लाखांचा 14 लाख 36 हजार 377 लिटर आणि चंद्रपूरमधून 18 लाखांचा 17 लाख 63 हजार 945 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. गडचिरोली जिल्ह्यातून एक लाखाचे 74 हजार 370 लिटर अवैध मद्य जप्त करण्यात आले. 

जप्त मद्यसाठ्याचे मूल्य (रुपयांत) 

59,43,995 
पुणे 

56,85,895 
ठाणे 

52,64,616 
नागपूर 

52,15,541 
पालघर 

36,55,464 
मुंबई उपनगर 

Web Title: Huge Amount of Alcohol Seized from Ministers District
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com