सोलापुरात साकारले गौतम बुद्धांचे भव्य पेंटिंग; जीवनप्रवासावर टाकला प्रकाश

Huge Gautam Buddha Painting Drawn By Solapur Artist
Huge Gautam Buddha Painting Drawn By Solapur Artist

सोलापूर : सोलापुरातील (Solapur) युवा चित्रकार सचिन खरात  यांनी तथागत गौतम बुद्धांचे (Gautam Buddha) तब्बल 14 बाय 9 फुटांच भव्यदिव्य कॅनव्हास पेंटिंग रेखाटलं आहे.  मागील जवळपास दोन महिन्यांपासून सचिन खरात आणि त्यांचे चार सहकारी मिळून हे पेंटिंग पूर्ण करण्यासाठी झटत होते.Huge Painting of Lord Gautam Buddha Drawn in Solapur

हे भव्य असं गौतम बुद्धाचं पेंटिंग पुण्यातील (Pune) विश्वनाथ कराड (Vishwanath Karad) यांच्या एम आय टी (MIT) विश्वविद्यालयातील सर्वात मोठ्या घुमटामध्ये लावण्यात येणार आहे. या तथागत गौतम बुद्धांच्या पेंटिंगमध्ये त्यांच्या जन्मापासून ते ज्ञानप्राप्तीपर्यंतचा सर्व प्रवास मांडण्यात आला आहे.

या एकाच पेंटिंगमध्ये तथागतांच्या जीवनातील विविध प्रसंग दर्शवणाऱ्या तब्बल 40 चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजहंस,कमळ,हत्ती,पाणी,निळशार आकाश अशा चित्रांमधून एक एक कहाणी उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दरम्यान या संपूर्ण पेंटिंगमध्ये त्रिशरण आणि पंचशील गाथेचा देखील सुयोग्य पद्धतीने वापर करण्यात आला आहे. सहसा बुद्धांच्या मुर्त्या,चित्रे ही 'बंद डोळ्यांचे बुद्ध' या मुद्रेत साकारल्या आहेत, मात्र सचिन खरात यांनी त्यांच्या पेंटिंगमध्ये 'उघड्या डोळ्यांचे बुद्ध' साकारले आहेत. एकीकडे कोरोनामुळे जगात अस्थिरता येत असताना चित्रकार खरात यांनी आपल्या तथागत गौतम बुद्धांच्या चित्राच्या माध्यमातून शांती आणि स्थिरतेच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.Huge Painting of Lord Gautam Buddha Drawn in Solapur

Edited By-Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com