पाण्यात सापडला मानवी मेंदू खाणारा जीवाणू,

साम टीव्ही
रविवार, 27 सप्टेंबर 2020

 

  • कोरोनापेक्षा ही जगावर मोठे संकट?
  • पाण्यात सापडला मानवी मेंदू खाणारा जीवाणू
  • संशोधकानी दिला सावधानतेचा इशारा

कोरोनामुळे तुम्ही आम्ही सारेच त्रासलेलो आहोत. त्यात आता आणखी भर टाकणारी बातमी आहे. संशोधकांना माणसाचा मेंदू कुरतडणारा एक जीवाणू आढळून आलाय. कुठे सापडलाय हा जीवाणू? तो नेमकं काय करतो?

पाहूयात साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट

कोरोनानं सारं जग हैराण आहे. या विषाणुनं आजवर शेकडो लोकांचा बळी घेतलाय. हे कमी होतं म्हणून की काय आता आणखी एक जीवघेणा विषाणू हातपाय पसरु पाहतोय. हा जीवाणू थेट माणसाचा मेंदूच खात असल्याचा दावा संशोधकांनी केलाय. अमेरिकेच्या टेक्सास प्रांताच्या दक्षिण पूर्व भागात पाणी पुरवठ्यामध्ये हा धोकादायक जीवाणू सापडलाय. त्यामुळे अमेरिकेतल्या आठ शहरांमधील नागरिकांना टेक्सासमधील प्रशासनान खबरदारीची सूचना दिल्या आहेत. 

सेंटर फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या माहितीनुसार मेंदू कुडतरणारा हा जीवाणू सर्वसाधारणपणे माती, गरम पाण्याचे कुंड, नदी आणि गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये सापडतो. हा जीवाणू स्वच्छतेचा अभाव असलेल्या स्वीमिंग पूलमध्येसुद्धा मिळू शकतो. शिवाय औद्योगिक प्लँटमधून निघणाऱ्या गरम पाण्यामध्येसुद्धा आढळून येतो. पाण्यामध्ये मेंदू खाणारा जीवणू सापडण्याचे प्रकार 8 सप्टेंबरपासून सुरू झाले होते. एका सहा वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर या जीवाणू बाबतचं संशोधन समोर आलय.

दरम्यान, अशाप्रकारचा जीवाणू आढळून आल्यानंतर टेक्सास कमिशननं पर्यावरण गुणवत्तेच्या आधारावर वॉटर ऍडव्हायजरी जारी केलीय. पाणी पुरवठ्यामधून येणाऱ्या पाण्यामध्ये नाइ-गेलेरिया फाऊलेरी म्हणजेच मेंदू कुडतरणारा जीवाणू सापडलाय. त्यामुळे या पाण्याचा वापर तत्काळ बंद करा, अशी सूचना करण्यात आलीय..अमेरिकेनं या जीवाणूचा वेळीच खात्मा करायला हवा अन्यथा जगात पुनः हाहाकार माजेल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live