चिंच फोडून रोजगारावर मात; सुप्यात शेकडो जणांच्या हाताला मिळाले काम

Tamarind Breaking giving good earning to Rural women in Pune District
Tamarind Breaking giving good earning to Rural women in Pune District

सुपे : एकतर कडक उन्हाळा Summer शेतातील कामे उरकत आलेली. त्यामुळे मजूरीची कामे कमी झाली. त्यात भरीसभर म्हणून कोरोना Corona महामारीच्या साथीमुळे रोजगार थंडावला असला तरी सुपे (ता.बारामती) Baramati परिसरात चिंच Tamarind फोडण्याच्या कामामुळे अनेकांना हाताला काम मिळाले आहे. या कामामुळे शेकडो कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागला आहे. Hundreds of people got the job of breaking the tamarind in Supa gaon

अलिकडच्या काही वर्षात चिंचेची Tamarind  मोठी बाजार पेठ म्हणून सुप्याची बाजारपेठ प्रसिद्ध झाली आहे. बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्याच्या सिमेवरील सुपे गावाला परिसरातील २५-३० गावांतील लोकांची नेहमी वर्दळ असते. सुपे हे मध्यवर्ती बाजार पेठेचे गाव आहे. राज्यातून तसेच राज्याबाहेरूनही चिंच खरेदीसाठी येथे व्यापारी येत असतात.

बारामती तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे Agricultural Produce Market Committee येथे उपबाजार आवार आहे. दर शनिवारी येथे चिंचेचा लिलाव होतो. गेल्या शनिवारी (ता.३) येथील मार्केट यार्डात Market Yard सुमारे साडेसात हजार अखंड चिंचेच्या पोत्यांची आवक झाली होती. कोरोनाच्या कडक बंदमुळे Lockdown एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी झालेल्या लिलावात Auction साडेचार हजार पोत्यांची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

फोडलेली चिंच प्रति क्विंटल दर ७ हजार १०० तर अखंड चिंचेचा दर २ हजार ७०० होता. चिंचोका १ हजार ३०० रूपये क्विंटल दर होता. प्रतवारीनुसार हा दर असल्याचे जगताप यांनी सांगितले. सुप्यात चिंचेचे स्थानिक व्यापारी असून, बाहेरूनही काही व्यापारी येऊन येथे व्यवसाय करतात. थेट झाडावरून चिंच आणून ती मजूरांकडून फोडून घेऊन फोडलेली चिंच शेजारील राज्यात पाठवून व्यवसाय करतात. सध्या सुप्यात शेकडो मजूरांच्या हाताला चिंच फोडण्याचे काम मिळाले आहे. मोजून चिंच घरी आणायची. चिंच फोडून टरफल, शिरा, चिंचोका व फोडलेली चिंच वेगळी करून पुन्हा वजन करून द्यायचे. Hundreds of people got the job of breaking the tamarind in Supa gaon

एक किलो चिंच फोडण्यासाठी दहा रूपये मिळतात. एका जणाला किमान १५ किलो चिंच फोडून होते. शिवाय घरातील अन्य व्यक्तीही यासाठी मदत करत असल्याने आठवड्याच्या बाजारहाटापुरता रोज मिळत असल्याची माहिती शालन साळुंके, मारूती सकट यांनी दिली. चिंचेचा हंगाम दरवर्षी फेब्रुवारी ते मे दरम्यान चालतो. सध्या सुमारे एक किलो चिंचेला साडेचारशे ग्रॅम एवढा उतारा मिळतो. त्यामुळे नफ्याचे प्रमाण घटले आहे. झाडाला मोहोर असताना झाडाचा सौदा ठरवला जातो. त्यावर नैसर्गिक संकटामुळे नुकसान होत असल्याने जोखीम पत्करून हा व्यवसाय करावा लागत असल्याची माहिती इब्राहिम बागवान, अच्युत नगरे, संपत जाधव या व्यावसायीकांनी दिली.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com