बार्शीत शेकडो पोलीस उतरले रस्त्यावर...

Heavy Bandobast in Barshi
Heavy Bandobast in Barshi

बार्शी : सोलापूर Solapur जिल्हायांतील बार्शी Barshi या तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित Corona रुग्णांची संख्या नवा उच्चांक गाठत आहे. तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यासह, ग्रामीण भागामध्ये सोमवार ते शुक्रवार कलम 144 प्रमाणे निर्बंध लागू केले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी बार्शीमध्ये शेकडोंच्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. Hundreds of police took to the streets in Barshi 

पोलिसांसोबतच नगरपालिकेचे कर्मचारी ही सेवा बजावताना पहायला मिळत आहेत. आज सकाळी बार्शी मध्ये काही व्यापाऱ्यांकडून दुकाने उघडण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्याने पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. या सर्वांमधून अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांना मात्र सूट देण्यात आली आहे. 

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कालच्या आकडेवारीने तर कहरच झाला केला आहे. एका दिवसात जिल्ह्यात तब्बल 1187 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत, यामध्ये 838 हे शहरातील तर 349 बाधित हे ग्रामीण भागातील आहेत. यामध्ये 18 जणांना कोरोनामुळे जीव Dead ही गमवावा लागला आहे, यामध्ये शहरातील 10 तर ग्रामीण भागातील 08 जणांचा समावेश आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com