वांग्याची भाजी न दिल्याने पत्नीला रॉकेल टाकून पेटवले

murder in latur
murder in latur

लातूर - पती पत्नीमधील किरकोळ वादावरून चक्क पत्नीला रॉकेल Kerosene टाकून पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची दुर्देवी घटना लातूर Latur जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हेर येथे घडली आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. husband threw kerosene on his wife 

उदगीर तालुक्यातील हेर येथील पीडित महिला फरजाना शादुल शेख यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की, तिचा नवरा शादुल शेख याचे इतर दुसऱ्या महिले सोबत संबंध आहेत. तसेच तो सतत दारू पीत असतो. लग्न झाल्यापासून तो पीडित विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. दिनांक 8 जून रोजी फिर्यादीने सकाळी आठ वाजता स्वयपाक केला, आणि पतीला जेवणाची विनंती केली. मात्र पती न जेवता तो घरातून बाहेर निघून गेला. त्यानंतर तो चक्क रात्री साडेनऊ वाजता घरी आला.

घरी आला त्यावेळी तो दारू पिलेल्या अवस्थेत होता.त्याने जेवनासाठी सकाळी केलेली वांग्याची भाजी मागितली. मात्र सकाळी केलेली भाजी संपल्यामुळे पत्नीने भाजी संपली असे सांगितल्यानंतर, मला तीच भाजी हवी आहे. असे म्हणून त्याने शिवीगाळ करून वाद घालायला सुरुवात केली. husband threw kerosene on his wife 

 या वादाच्या रागातच चुली जवळ ठेवलेल्या रॉकेलच्या बाटली मध्ये असलेले रॉकेल फिर्यादीच्या अंगावर टाकले, आणि काडी ओढून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पीडित महिला ही 25 टक्के भाजली असून शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकून धावत येऊन आग विझवली. फिर्यादीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

हे देखील पहा -

 केवळ भाजीच्या कारणावरून पत्नीला जिवे मारण्याच्या उद्देशाने रॉकेल टाकून पेटवून दिल्यामुळे हेर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंचवीस टक्के भाजलेल्या फिर्यादीस लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी शादुल शेख यास उदगीर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com