पुणे-मुंबईदरम्यान हायपरलूपची छाननी प्रक्रिया सुरू

पुणे-मुंबईदरम्यान हायपरलूपची छाननी प्रक्रिया सुरू

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुणे-मुंबईदरम्यान हायपरलूप प्रकल्प ‘स्वीस चॅलेंज’ पद्धतीने सार्वजनिक व खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत या प्रकल्पासंदर्भात आर्थिक व इतर दायित्वे, जमीन भूसंपादन, सवलती, जोखीम विश्‍लेषण व नियोजन यानुषंगाने ‘महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास सक्षम प्राधिकरणा’च्या (महाआयडीया) स्तरावर छाननी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पासंदर्भात विधान परिषदेमध्ये प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शिंदे यांनी ही माहिती दिली. पुणे-मुंबईदरम्यान अतिवेगवान प्रवासासाठी सुमारे ७० हजार कोटी रुपये खर्चाचा हायपरलूप प्रकल्प प्रस्तावित आहे.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर वाहतूक क्षेत्रातील क्रांती म्हणून समजल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मध्यंतरी पालकमंत्री अजित पवार यांनी हा प्रकल्प राबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. असे असताना नगरविकास मंत्र्यांनी मात्र या प्रकल्पावर काम सुरू असल्याचे सांगितल्याने आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.


WEB TITLE- Hyperloop scrutiny process started during Pune-Mumbai

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com