'' मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मला कुणाचीही गरज नाही''

लक्ष्मण सोळुंके
मंगळवार, 25 मे 2021

मेटे हे मेटे असून छत्रपती संभाजी हे छत्रपती संभाजी आहेत माझी आणि मेटेंची तुलना करू नका, असंही ते म्हणाले.

जालना: मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मला कुणाचीही गरज नाही, मला समाजाचा भरपूर पाठिंबा आहे असे सांगत खासदार संभाजीराजे भोसले यांनी भाजपच्या पाठिंब्याला नकार दिला आहे. मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार झटकत असलं तरी समाजासाठी काय करता येईल हे 27,28 तारखेनंतर ठरवू असंही संभाजीराजे भोसले यांनी म्हटलंय. मी दिसायला तरुण असलो तरीही 50 वर्षाचा आहे असा टोलाही त्यांनी मारलाय. जालन्यात ते बोलत होते. मराठा समाजासाठी काय करता येईल हे या सरकारने स्पष्ट करावे असंही संभाजीराजे सांगायला विसरले नाहीत. येत्या 5 तारखेला विनायक मेटे हे मोर्चा काढणार आहेत याबद्दल विचारलं असता मेटे हे मेटे असून छत्रपती संभाजी हे छत्रपती संभाजी आहेत माझी आणि मेटेंची तुलना करू नका, असंही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर संपूर्ण राज्यातील मराठा समाजाच्या समन्वयकांशी पुढे काय करायचं यासंदर्भात चर्चा सुरू असून 27, 28 तारखेला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका स्पष्ट करू असंही ते म्हणाले.(I don't need anyone for the Maratha community movement- sambhaji raje)

हे देखील पाहा


संबंधित बातम्या

Saam TV Live