वसुंधरा राजे आता खूप जाड झाल्यात- शरद यादव

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नवी दिल्लीः राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आता खूप जाड झाल्या असून थकडल्या आहेत, त्यांना आता विश्रांती द्या, असे माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी म्हटले होते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, आपण हे गंमतीतून म्हटल्याचा खुलासा यादव यांनी केला आहे.

नवी दिल्लीः राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आता खूप जाड झाल्या असून थकडल्या आहेत, त्यांना आता विश्रांती द्या, असे माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी म्हटले होते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, आपण हे गंमतीतून म्हटल्याचा खुलासा यादव यांनी केला आहे.

राजस्थान विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अल्वर येथील मुंडावर मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेदरम्यान बोलताना शरद यादव म्हणाले होते की, 'राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आता खूप जाड झाल्या असून थकल्या आहेत, त्यांना आता विश्रांती द्या.' या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. टीकेला सोमोरे जावे लागल्यनंतर खुलासा करताना म्हटले आहे की, आपण हे गंमतीत बोललो होतो, त्यांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. माझे त्यांच्याशी जुने संबंध आहेत. कोणत्याही दृष्टीने ते अपमानजनक नव्हते. जेव्हा मी त्यांना भेटलो होतो तेव्हा त्यांनाही तुमचे वजन वाढले असल्याचे सांगितलं होते.'

शरद यादव यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. 24 जानेवारी 2017 रोजी पाटणामधील एका प्रचार सभेत शरद यादव म्हणाले होते की, 'मताची इज्जत मुलीच्या इज्जतीपेक्षा मोठी असते. त्यांच्या या वक्तव्यावरही टीका झाली होती. त्यावेळीही त्यांना खुलासा करावा लागला होता. आपल्याला असे म्हणायचे नव्हते, तर मुलीवर जसे प्रेम करता तसे मतांवरही प्रेम करा, असे म्हणायचे होते.'

'शरद यादव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे माझ्यासह सर्वच महिलांचा अपमान झाला आहे. निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करणार आहे,' असे वसुंधरा राजे म्हणाल्या.

Web Title: I feel insulted Vasundhara Raje on Sharad Yadavs fat jibe


संबंधित बातम्या

Saam TV Live