ICSI CS Exam : कोरोना साथीमुळे CS च्या परीक्षा पुढे ढकलल्या 

ICSE.jpg
ICSE.jpg

वृत्तसंस्था : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियामार्फत ICSI 10 ते 20 ऑगस्ट दरम्यान फाउंडेशन प्रोग्राम Foundation program, एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम Executive Program आणि प्रोफेशनल प्रोग्रामसाठी Professional programs सीएस परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत.  कोविड 19  साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर  या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या नव्या तारखा icis.edu या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (ICSI CS Exam: CS exams postponed due to corona) 

जुन्या अभ्यासक्रमाची कार्यकारी परीक्षा 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येईल. तर नवीन अभ्यासक्रमाची एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम एक्साम   18 ऑगस्ट रोजी संपेल. त्याचबरोबर आयसीएसआय सीएस प्रोफेशनलच्या जुन्या आणि अभ्यासक्रमाची परीक्षा 20 ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. अशी माहिती इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने दिली आहे.  सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत या परीक्षा घेण्यात येणार आहेत. फाउंडेशन प्रोग्रामची परीक्षा 13 आणि 14 ऑगस्ट रोजी होईल. तर सकाळी 9.30 ते 11, दुपारी 1:30 ते दुपारी 1:30, दुपारी 2.30 ते  सायंकाळी 4, सायंकाळी 5 ते 6.30  या वेळेत या परीक्षा शिफ्टमध्ये आयोजित केल्या जातील.  एका दिवसात दोन पेपर होतील.

दरम्यान, यापूर्वी ही परीक्षा जूनमध्ये होणार होती. मात्र कोरोना साथीची परिस्थिती पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तथापि, विद्यार्थ्यांना पेपरसाठी पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. अधिकृत वेबसाइटनुसार, "जून 2021  च्या परीक्षेचे सत्र पुढे ढकलल्यामुळे  जून 2021 च्या सत्रासाठी नावनोंदणीची विनंती सादर करताना ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी वैध होती, ते सर्व विद्यार्थी डी-नोव्हो घेतील. तर  "उर्वरित परीक्षा प्रत्यक्षात घेतल्या गेल्या तरी सीएस जूनच्या परीक्षेस बसण्यास पात्र ठरविले जाईल."

Edited By - Anuradha Dhawade  

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com