बिबीगावच्या तरुणांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श उपक्रम...

संजय जाधव
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

संपूर्ण देश कोरोणा विषाणूच्या विळख्यात अडकला आहे. रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड सध्या लवकर मिळत नाहीत. त्यात रक्ताची कमतरता भासू नये व शासनाच्या आवाहनानुसार लोणार तालुक्यातील बिबीगाव येथील नवतरुणांनी रक्तदान शिविर आयोजित केले होते

बुलढाणा : संपूर्ण देश कोरोना Corona विषाणूच्या विळख्यात अडकला आहे. रुग्णांना ऑक्सिजन Oxygen आणि व्हेंटिलेटर Ventilator बेड Bed सध्या लवकर मिळत नाहीत. त्यात रक्ताची कमतरता भासू नये व शासनाच्या आवाहनानुसार लोणार Lonar तालुक्यातील बिबीगाव येथील नवतरुणांनी रक्तदान शिविर आयोजित केले होते. The ideal activity of the youth of Bibigaon against the backdrop of Corona 

१ मे पासून १८ वर्ष वयोगटावरील महाराष्ट्र Maharastr शासनाच्या निर्देशानुसार मोफत कोविड Covid लसीकरण करण्यात येणार आहे, आणि त्यानंतर किमान ३ महिने रक्तदान करता येणार नाही, आणि राज्यात रक्ताचा तुटवडा भासेल, ही बाब लक्षात घेऊन बिबीगाव Bibigaon येथील नवतरूनांनी एकत्रित येत ग्रामीण Rural रुग्णालय येथे भव्य रक्तदान Blood donation शिबिराचे आयोजन केले आहे. 

या रक्तदान शिबीरात ५६ जनांनी रक्तदान केले आहे. सध्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराला बिबीगाव परिसरातील तरुण युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या कार्यक्रमासाठी येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सुराणा, डॉ.मापारी, डॉ.नाईक यांनी विशेष योगदान दिले आहे. या रक्तदान कार्यक्रमात तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

Edited By- Digambar Jadhav

  

 

संबंधित बातम्या

Saam TV Live