कोरोनाच्या लढ्यातील आदर्श गाव, दर 3 दिवसांआड केली जाते आरोग्य तपासणी

साम टीव्ही
बुधवार, 13 मे 2020
  • कोरोनामुक्त गाव ठेवण्यासाठी ग्रामस्थांची धडपड
  • दर 3 दिवसांआड केली जाते आरोग्य तपासणी
  • अनोळखी व्यक्तीला गावात प्रवेश नाही

कोरोनाच्या संकटांन सारा देश हादरलाय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वजण आपापल्या परीनं प्रयत्न करतायेत. कोरोनावर मात करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड लपाली ग्रामपंचायतीनं  अशा काही उपाययोजना केल्या आहेत ज्या पाहून तुम्हीही चाट पडाल. कोरोनाच्या संकटात या छोट्याश्या गावाची ही आदर्श कामगिरी.

हे आहे बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड हे छोटसं गाव....प्रशासनाने ओरडून सांगितल्यानंतरही जे आजवर तुम्हा आम्हाला जमलं नाही ते या छोट्याशा गावानं करून दाखवलंय. या गावानं कोरोनाला चारीमुंड्या चीत करण्याचा प्लॅन आखलाय. गावकऱ्यांनी सिंदखेडच्या चारही सीमा सील केल्या आहेत. अनोळख्या व्यक्तीला गावात प्रवेश नाही.

गावातील प्रत्येक व्यक्तिची दर तिसऱ्या दिवशी आरोग्य तपासणी केली जाते. तसंच कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून नियमीतपणे फवारणीदेखील होते. गावातल्या एखाद्या व्यक्तीला लक्षणं आढळून आली तर गावाबाहेर 3 कि.मी. अंतरावर क्वारंटाईन सेंटरची व्यवस्था करण्यात आलीय. जिथं क्वारंटाईन लोकांची पुरेपुर व्यवस्था करण्यात आलीय. 
विशेष म्हणजे सिंदखेड लपालीच्या सरपंचपदाची धुरा एका महिलेच्या खांद्यावर आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सारा गाव कोरोनाला दूर ठेवण्यासाठी झटतोय. आशा वर्कर्स, वैद्यकीय अधिकारी गावात राहून सर्वांची काळजी घेतायेत. 
 एकीकडे कोरोनाला दूर करण्यासाठी घरा राहा, सोशल डिन्सन्सिंगचं पालन करा, असं प्रशासन ओरडून ओरडून सांगतंय. पण अजूनही बऱ्याच भागात लोकांचा मुक्त संचार दिसून येतोय. मात्र सिंदखेड सारख्या गावानं घेतलेली भूमिका अशा लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी पुरेशी आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live