भाजपनं ठरवलं तर आम्ही ठाकरे सरकार पाडू : नारायण राणे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

मुंबई : "" जर भाजपने ठरवलं तर आम्ही ठाकरे सरकार कधीही पाडू,'' असा इशारा आता भाजप नेते नारायण राणे यांनी दिला आहे. 

गेल्या काही दिवसापासून भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले असून हे सरकार पाडण्याचे विधान जवळजवळ सर्वच नेते करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र थोडी वेगळी भूमिका घेत आम्हाला हे सरकार पाडण्यात स्वारस्य नसल्याचे म्हणतानाच यापुढे शिवसेनेशी युती करणार नसल्याचे जाहीर केले होते. 

आता राणे यांनीही सरकार पाडण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा कोकणाला कोणताच योगदान नाही, सांगावं त्यांनी कोणतं योगदान दिले आहे. आरोग्यव्यवस्थेबाबत काहीही चर्चा नाही. विकासकाम बंद तर विकास काय करणार ? 

राज्य कोकणासह मागे घेऊन देण्याचं काम करत आहे.भराडी आईच दर्शन घेतलं आणि लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा काम केलं. थापा मारून विकासाला निधी न देता, कॅबिनेट न करता ते गेले असेही राणे यांनी म्हटले आहे. 
 
WebTittle :: If BJP decides, we will defeat Thackeray government: Narayan Rane

संबंधित बातम्या

Saam TV Live