विवाहित स्त्रीने जर या गोष्टी केल्या तर पुरुषाला घडेल चांगलीच अद्दल, वाचा हे स्त्रीचे 8 हक्क

सिद्धी चासकर.
शुक्रवार, 19 मार्च 2021

 विवाहित स्त्रीयांसाठी चे भारतीय कायदेशीर हक्क काय आहेत  आणि त्या हक्कांबद्दलची माहीती काय आहे जाणून घेऊयात..

"विवाह" हे एक पुरुष आणि स्त्री अश्या दोन व्यक्तीमधील बंधन हे दोघांच बंधन एका घट्ट धाग्यासारखं असतं, हे बंधंन फक्त दोघांनाच नाही तर समाजातील लोक आणि कुटुंबास देखील एकत्र बांधून ठेवतो. मात्र ह्या विवाह बंधनात अनेकदा अडी अडचणी येतात, त्यामुळे काहींचं वैवाहिक जीवन हे यशस्वी  होत तर काहीच विस्कळीत ही होतं, बऱ्याच वेळा जोडप्यांना लग्नं हे अयशस्वी भयानक आणि कठीण ठरतो, अशी बरीच प्रकरणं समोर आली आहेत, ह्या प्रकरणांमध्ये स्त्रीयांनाच जास्त अत्याचार सहन करावा लागतो त्यांनाच सगळ्या गोष्टींमध्ये अॅडजेस्टमेंट करावं लागतं कारण त्यांना महिलांच्या कायदेशीर हक्कांची माहिती नसते, मात्र आता कायदेशीर हक्क आपण जाणून घेऊ आणि लढा ही देऊ शकतो, त्यामुळे भारतीय कायदेशीर हक्क काय आहेत  आणि त्या हक्कांबद्दलची माहीती काय आहे जाणून घेऊयात..
मेट्रिमोनियल आणि नव-याच्या घरी राहण्याचा, घटस्फोटाचा अधिकार-: 

1) एका विवाहित स्त्रीची परिस्थिती कशीही असली आणि तिचा नवरा मरण पावला असला तरी पत्नी आपल्या सासरच्या घरी राहू शकते किंवा तिच्या मेट्रिमोनियल घरी राहण्याचा पूर्ण हक्क आहे. जर हा विषय घटस्फोटापर्यंत पोचला असेल तर पत्नी तोपर्यंत नव-याच्या घरी राहू शकते जोपर्यंत तिची दुसरीकडे राहण्याची काही सोय होत नाही. जर स्त्रीला त्याच घरात रहायचे असेल तर ते देखील तिच्या कायदेशीर अधिकारात आहे. 
2) हिंदू विवाह अधिनियम कलम 13 1995 अन्वये पतीने व्यभिचार, क्रूरता, शारीरिक किंवा मानसिक छळ केला असल्यास पत्नी नव-याच्या सहमतीविनाही घटस्फोट घेऊ शकते. यासह महिला आपल्या पतीकडून देखभाल शुल्काची मागणीही करू शकते. 
3) 'इंडियन पेनल कोड' कलम १२५ अन्वये, एक पत्नी आपल्यासाठी आणि आपल्या मुलासाठी नव-याकडून पैशांची मागणी करू शकते. खासकरून पती तिच्यापेक्षा जास्त पैसा कमवत असेल तर नक्कीचं पैसे घेऊ शकते.


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live