शिवसेनेनं प्रश्न उपस्थित केला नाही, तर केंद्र सरकार मनमानी करेल : प्रकाश आंबेडकर 

शिवसेनेनं प्रश्न उपस्थित केला नाही, तर केंद्र सरकार मनमानी करेल : प्रकाश आंबेडकर 

पुणे : एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण केंद्र सरकारने एनआयएकडे सोपविण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या मुद्यावर शिवसेनेनं प्रश्न उपस्थित केला नाही, तर केंद्र सरकार मनमानी करेल. 

केंद्राच्या या निर्णयावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. त्यापाठोपाठ वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे. 

आंबेडकर म्हणाले, की एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा ही प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केंद्राकडे का पाठवले नाही ? असा माझा सवाल आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेच मी स्वागत करतो. हे प्रकरण केंद्रानं एनआयएकडे दिला आहे. हा एक प्रकारे मुख्यमंत्र्यांवर केंद्राकडून अविश्वासच आहे. त्यामुळे शिवसेनेनं प्रश्न उपस्थित केला नाही, तर केंद्र सरकार मनमानी करेल. 

भिमा-कोरेगाव दंगलप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी सातत्याने संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी लावून धरली होती. या दंगलीला हे दोघे जबाबदार आहेत असा त्यांनी आरोप केला होता.  

WebTittle ::  If the Shiv Sena does not raise the question, the central government will do it arbitrarily: Prakash Ambedkar


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com