अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत शिवसेना महाआघाडी करणार का? तसं झाल्यास तिकीटाचे वाटप कसे होणार? 

साम टीव्ही
रविवार, 31 जानेवारी 2021
  • अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत शिवसेना महाआघाडी करणार का ? 
  • महाआघाडी झाल्यास शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये तिकीटाचे वाटप कसे होणार ? 
  • भाजपा या महा आघाडीला कशी तोंड देणार ?

 अंबरनाथ नगरपालिकेच्या 2020 मध्ये होणाऱ्या निवडणूका कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या निवडणूका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या या नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र राज्यात शिवसेना महाआघाडित असल्यानं आता नगरपालिका निवडणूकीत काय समीकरणं असणार याची स्थानिक पातळीवर उत्सुकता आहे

सध्या अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना हा मोठा पक्ष आहे. तर सेने सोबत सत्तेत राष्ट्रवादी सामिल आहे. नगरपालिकेत एकूण 57 नगरसेवक असून त्यात शिवसेनेचे 25,भाजपचे 10,राष्ट्रवादी काँग्रेस चे 5 ,राष्ट्रीय काँग्रेस चे 8 ,मनसे चे 2 तर अपक्ष 7 नगरसेवक आहेत. आता आगामी  निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेस स्वबळावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. स्थानिक पातळीवर पूर्वी पेक्षा आमची ताकद वाढली आहे. त्यामुळे महाआघाडी बाबत निकालानंतर विचार करू असं , राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस शहरअध्यक्षांचं म्हणणं आहे.

 

मुंबई लोकलनं प्रवास करताय तर हे नियम वाचाच! नाहीतर इतका दंड बसू शकतो!

अंबरनाथ मध्ये गेली २५ वर्ष अंबरनाथ नागरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असल्याने महाआघाडीचा प्रश्नच उद्भवत नाही, जर वरिष्ठांन कडून महाआघाडी करण्याचे आदेश आले तरीही आम्ही आमच्या सध्या असलेल्या जागांवरचा दावा सोडणार नसल्याचे अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि अंबरनाथ विधानसभाचे आमदार बालाजी किणीकर यांनी सांगितलंय.

या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर खरं आव्हान आहे ते भाजपचे,भाजप ने शहरात अभिजित करनजुले यांच्या रूपाने तरुण शहरप्रमुख शहराला दिला असून,या निवडणुकीत अंबरनाथ शहरात गेल्या २५ वर्षात शिवसेने केलेला भ्रष्टाचाराचा मुद्दा हा आमचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार आहे. सत्ताधाऱ्यां विरोधात नागरिकांमध्ये संताप असून,येत्या निवडणुकीत जनता त्यांना त्याची जागा दाखवून देईल अशी प्रतिक्रिया भाजप शहरप्रमुख अभिजित करनजुले यांनी दिली
 

पालिकेत आता राजकीय समिकरणं कशी असतील याकडे अंबरनाथकर मतदारांचं लक्ष आहेचं. मात्र राज्यात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग स्थानिक पातळीवर कितपत यशस्वी यात सध्या तरी शंका आहे. त्यात अंबरनाथ-बदलापूर महानगरपालिकाही प्रस्तावित असल्यामुळे यात काही ट्विस्ट येतो का हे पहाणेही महत्त्वाचे असणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live